Birth Day Special : शबाना आझमी यांनी दोनदा केला होता आत्महत्येचा प्रयत्न!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 05:42 AM2017-09-18T05:42:14+5:302017-09-18T11:12:14+5:30

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा आज (१८ सप्टेंबर) वाढदिवस. १८ सप्टेंबर १९५० रोजी जन्मलेल्या शबाना यांनी ‘अंकुर’ चित्रपटाद्वारे ...

Birth Day Special: Shabana Azmi attempted suicide twice! | Birth Day Special : शबाना आझमी यांनी दोनदा केला होता आत्महत्येचा प्रयत्न!!

Birth Day Special : शबाना आझमी यांनी दोनदा केला होता आत्महत्येचा प्रयत्न!!

googlenewsNext
लिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा आज (१८ सप्टेंबर) वाढदिवस. १८ सप्टेंबर १९५० रोजी जन्मलेल्या शबाना यांनी ‘अंकुर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतरच्या आपल्या करिअरमध्ये १३० हून अधिक व्यावसायिक व समांतर चित्रपटांत त्या दिसल्या. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांतही त्यांनी भूमिका वठवल्या. 
 ‘जुनून’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘कंधार’, ‘स्पर्श’, ‘पार’, ‘सती’, ‘अर्थ’, ‘गॉडमदर’ इत्यादी एका पेक्षा एक सरस अशा चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. जॉन श्लेसिंगर यांचा ‘मॅडम सोऊसाटस्का; आणि रोनाल्ड जॉफ यांचा ‘सिटी आॅफ जॉय; या हॉलिवूड चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला आहे. कवी आणि पटकथाकार जावेद अख्तर यांची पत्नी असलेल्या शबाना आझमी अभिनय करण्याबरोबर सामाजिक आणि स्त्रियांच्या अधिकाराच्या चळवळीतदेखील सक्रिय असतात. पण यापलीकडे शबाना आझमी यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी आहेत, ज्या कदाचितच आपल्याला ठाऊक असतील.




शबाना आझमी यांच्या आई शौकत आझमी यांनी ‘कैफ अ‍ॅण्ड आय मेमॉयर’ या आत्मचरित्रात शबाना यांच्या आयुष्याबद्दलची अनेक रहस्ये लिहिली आहे. शबाना यांनी लहानपणी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे शौकत यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.

आपल्या आईचे लहान भावावर (बाबा)आपल्यापेक्षा अधिक प्रेम आहे, असे शबाना यांना वाटायचे. शौकत यांनी लिहिलेयं की, शबाना कायम तिच्यात व लहान भावात तुलना करायची. मी तिच्यापेक्षा तिच्या लहान भावावर प्रेम करते, असे तिला वाटायचे. अर्थात यात थोडी सत्यताही होती. कारण बाबा येण्यापूर्वी मी माझा पहिला मुलगा खय्याम गमावून बसली होती. त्याच्या मृत्यूने मला असुरक्षित करून सोडले होते. बाबा आला अन् त्याने खय्यामची कमतरता भरून काढली, असे मला वाटायचे.



एका किस्सा शेअर करताना शौकत यांनी लिहिलेयं की, एका सकाळी शबाना व बाबा नाश्ता करत होते. यावेळी मी शबानाच्या प्लेटमधली टोस्ट उचलून बाबाच्या प्लेटमध्ये टाकली. बाबाला घाई आहे, तू थांब, मी तुला लगेच बनवून देते, असे मी शबानाला म्हणाले. पण माझे ऐकण्याऐवजी शबाना तडक बाथरूमध्ये गेली व रडत बसली. मला रडण्याचा आवाज येताच मी बाथरूमकडे धावले. पण शबाना अश्रू पुसून शाळेत निघून गेली. यानंतर शबानाने शाळेतच्या प्रयोगशाळेत कॉपर सल्फेट खाल्ले.

ALSO READ : ​-आणि सलग दहा मिनिटं हुमसून हुमसून रडल्या शबाना आझमी...!

शौकत यांनी आणखी एक किस्सा लिहिलाय. त्यांनी लिहिलेय की, एकदा मी रागारागात शबानाला घरून निघून जा, असे म्हटले. यानंतर शबानाने रेल्वे स्थानकावर रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शाळेच्या गार्डने तिला वाचले होते. या घटनेनंतर मात्र मी हादरून गेले. शबानाला आता अतिशय काळजीपूर्वक वागवायचे, हे मी त्यावेळी ठरवून टाकले.



शबाना यांनी थिएटरपासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. आधी शबानांची पर्सनॅलिटी बघून त्यांना मुलाचे रोल दिले जात. कॉलेज आयुष्यात असताना शबाना यांनी जया बच्चन यांचा ‘सुमन’ हा चित्रपट पाहिला अन् त्या जया बच्चनच्या अभिनयाने अशा काही प्रभावित झाल्या की, त्यांनी अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वत:चा निर्णय आपल्या अब्बांना सांगितला. अब्बांनी हसत हसत परवानगी दिली. तुला मोची बनायचे असेल तरी मला हरकत नाही. फक्त  जगातील सर्वोत्तम मोची बनशील, असे एक वचन  मला तुझ्याकडून हवे, असे ते शबाना यांना म्हणाले होते.



१९८४ मध्ये शबाना यांनी जावेद अख्तर यांच्याशी लग्न केले. जावेद यांचा हा दुसरा विवाह होता. जावेद शबानांच्या अब्बांना भेटायला येत. याचदरम्यान शबाना व जावेद यांची मैत्री झाली आणि पुढे प्रेम. १९८४ मध्ये जावेद यांनी आपल्या पहिल्या पत्नीला ‘तलाक’ देत शबानांशी लग्न केले.

Web Title: Birth Day Special: Shabana Azmi attempted suicide twice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.