Birthday Special : बालपणी इतकी क्यूट दिसायची सारा अली खान, पाहा 10 Unseen Pictures!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 08:00 AM2019-08-12T08:00:00+5:302019-08-12T08:00:01+5:30
अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खान हिचा आज वाढदिवस.
अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खान हिचा आज वाढदिवस. आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याने मन जिंकणारी सारा कमालीची नम्र आहे. तिच्या या नम्र स्वभावामुळे सगळीकडून तिचे कौतुक होत असते. आज साराच्या वाढदिवशी तिचे बालपणीचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात सारा इतकी क्यूट दिसतेय की, तुम्ही तैमूरलाही विसराल.
साराने अगदी लहानपणीचे अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न पूर्ण केले. बॉलिवूडमध्ये येण्याआधी तिचे वजन 96 किलो होते. कॉलेजमध्ये सगळे तिला मोटी म्हणूनच चिडवायचे. पण साराने यावरही मात केली. कॉलेजच्या दुसºया वर्षाला असल्यापासून तिने वजन कमी करणे सुरु केले आणि तीन वर्षांत वजन कमी करून दाखवले.
सारा अली खान आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. सध्या तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर्स आहेत. साहजिकच याचे सगळे श्रेय साराची आई अमृता सिंग यांचे आहे. अमृताने साराला केवळ लहानाचे मोठे केले नाही तर तिला उत्तम संस्कारही दिलेत.
सध्या सारा कार्तिक आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहेत. सारा आणि कार्तिकचा ‘लव आज कल 2’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या चित्रपटाच्या सेटवर दोघेही जवळ आलेत. शूटींग व्यतिरिक्तही ही जोडी अनेकदा बाहेर फिरताना दिसली. अद्याप सारा व कार्तिक त्यांनी आॅफिशिअली काहीही सांगितले नसले तरी लोकांनी या दोघांची जोडी कन्फर्म करुन टाकली आहे.
साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. पाठोपाठ रणवीर सिंगसोबत ‘सिम्बा’मध्ये ती झळकली. लवकरच ‘लव आज कल 2’मध्ये ती दिसणार आहे. याशिवाय वरूण धवनसोबत ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्येही तिची वर्णी लागली आहे.