BIRTHDAY SPECIAL : अभिनयातील ‘अर्जुन’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2016 10:14 AM2016-11-26T10:14:50+5:302016-11-26T10:24:28+5:30
‘प्यार, ईश्क और मोहब्बत’पासून त्याचा बॉलिवूडमधील प्रवास सुरू झाला होता. वाढदिवसानिमित्त त्यावर टाकलेला हा एक दृष्टीक्षेप.
‘ ँडसम हंक’ अर्जुन रामपालची ओळख फॅशन मॉडेल, व्हर्सेटाईल अभिनेता, निर्माता, टीव्ही होस्ट म्हणून आहे. मनमौजी, स्वतंत्र, ठाम व्यक्तीमत्त्वाच अशी त्याची ख्याती. कधी ‘ओम शांती ओम’मध्ये खलनायकाची भूमिका करून तो प्रेक्षकांना चिंतेत टाकतो तर कधी ‘हाऊसफुल्ल’मध्ये हसवून हसवून लोटपोट करतो. मोजक्याच पण आशयसंपन्न चित्रपटात पूर्ण समर्पणाने भूमिका करणाऱ्या अर्जुनची भुरळ विशेष करून तरुणींमध्ये जास्त आहे. आज त्याचा वाढदिवस.
‘प्यार, ईश्क और मोहब्बत’पासून त्याचा बॉलिवूडमधील प्रवास सुरू झाला होता. वाढदिवसानिमित्त त्यावर टाकलेला हा एक दृष्टीक्षेप. तत्पूर्वी ‘सीएनएक्स मस्ती’कडून अर्जुनला हार्दिक शुभेच्छा!!
बालपणापासून स्वप्नाचा ध्यास :
त्याचा जन्म मध्यप्रदेशातील जबलपूर येथे २६ नोव्हेंबर १९७२ रोजी झाला. अमरजीत आणि ग्वेन रामपाल यांचा तो मुलगा. घरात सैनिकी शिस्तीचे वातावरण. त्याचे आजोबा ब्रिगेडियर गुरूदयाल सिंग यांनी भारतीय आर्मीसाठी पहिली बंदुक तयार केली होती. आईवडिलांच्या घटस्फोटामुळे तो आईजवळ राहू लागला.
हॉट कपल : अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिआ
‘सेंट पॅट्रिक स्कूल’ येथे त्याने शालेय शिक्षणाला सुरूवात केली. ‘कोडाईकॅनल इंटरनॅशनल स्कूल’ येथे उच्चशिक्षण घेतल्यानंतर तो दिल्लीला रवाना झाला. अर्थशास्त्रात ‘आॅनर्स’ मिळवल्यानंतर तो प्रसिद्ध मॉडेल होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडू लागला. मॉडेलच काय पण उत्कृष्ट अभिनेत्यासह निर्माता, दिग्दर्शकही तो बनला. १९९८ मध्ये त्याने मेहर जेसिआशी लग्न केले. त्याला ‘माहिका’ आणि ‘मीरा’ या दोन मुली आहेत.
करिअरला सुरूवात :
२००१ मध्ये दिग्दर्शक राजीव राय यांच्या ‘प्यार, ईश्क और मोहब्बत’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा ‘बेस्ट मेल डेब्यू’चा पुरस्कारसुद्धा मिळाला. ‘दिवानापन’ व ‘मोक्ष’सारख्या चित्रपटांना बॉक्सआॅफिसवर जेमतेम प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याने ‘आंखे’ चित्रपट केला. त्याने अंध व्यक्तीची केलेली भूमिका चाहत्यांना तुफान आवडली. चित्रपटाने अपेक्षेहून अधिक कमाईसुद्धा केली.
हँडसम हंक : अर्जुन रामपाल
या चित्रपटानंतर तो खऱ्या अर्थाने लाईमलाईटमध्ये आला. ‘चेसिंग गणेशा फिल्म्स’ नावाने कंपनी सुरू करून निर्मिती क्षेत्रात उडी घेतली. २००७ साली आलेला ‘ओम शांती ओम’ ब्लॉकबस्टर ठरला. शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणच्या मुख्य भूमिकेतील या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. वेगळी वाट म्हणून त्याने मग टीव्ही जगतातही उडी घेतली. ‘नच बलिये’ मध्ये परीक्षक म्हणून तर ‘लव्ह टू हेट यू’ मध्ये होस्ट म्हणून जबाबदारी स्विकारली.
‘बी टाऊन’ मधील संघर्ष :
बॉलिवूडमधील तारे-तारका म्हटल्यावर त्यांच्यात आपसात वाद, प्रतिवाद, वैचारिक मतभेद संघर्ष हे असणारच. त्यात शांत, गंभीर स्वभावाचा अर्जुन रामपालही अपवाद नाही.
* शाहरूख खानसोबत त्याचे सुरूवातीच्या काळात मित्रत्वाचे संबंध होते. मात्र, ‘रावन’ या शाहरूख खान निर्मित चित्रपटात अर्जुनची भूमिका कमी करण्यात आली त्यावरून नाराज होऊन त्याने शाहरूख सोबतचे संबंध कमी केले. पण, या घटनेनंतर त्याने ती अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
* २०१२ मध्ये राम गोपाल वर्मा अर्जुनच्या घरी चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन गेला असता तो म्हणाला,‘मला कुत्रे आणि लहान मुलांचा तिरस्कार वाटतो. तेव्हा अर्जुनची पत्नी मेहेर त्याला म्हणाली,‘तू आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून निघून आमच्या घरात दोन मुली आहेत.’
* २०१४ मध्ये हृतिक रोशन आणि सुझैन रोशन यांच्या घटस्फोटाला अर्जुनला जबाबदार मानण्यात येते.
वुई आर फॅमिली : अर्जुन रामपाल पत्नी मेहेर आणि दोन मुलींसोबत
काय आवडते अर्जुनला?
विषय - इतिहास आणि साहित्य
चित्रपट - मोक्ष, दिवानापन
वाद्य - गिटार
खाद्य - चिकन
पेय - वाईन
रंग - काळा
गाणे -ओम शांती ओम
संगीत - रिमिक्स
ठिकाण-थायलंड, पॅरिस, न्यूयॉर्क
खेळ - फुटबॉल, टेनिस
अर्जुनच्या चित्रपटातील काही प्रसिद्ध गाणी :
* हमको तुमसे प्यार है
* दर्मियां (इंकार)
* साजन साजन
* नच नच नच
* हाय दिल