Birthday Special : या अभिनेत्यासोबत झाले होते अदिती राव हैदरीचा 21 व्या वर्षी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 09:15 AM2017-10-28T09:15:34+5:302017-10-28T15:01:06+5:30

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक असेलली अदिती राव हैदरी आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करते आहे. आदिता जन्म हैदराबादमधल्या ...

Birthday Special: The actor was married to Aditi Rao Hydari's 21st year | Birthday Special : या अभिनेत्यासोबत झाले होते अदिती राव हैदरीचा 21 व्या वर्षी लग्न

Birthday Special : या अभिनेत्यासोबत झाले होते अदिती राव हैदरीचा 21 व्या वर्षी लग्न

googlenewsNext
लिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक असेलली अदिती राव हैदरी आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करते आहे. आदिता जन्म हैदराबादमधल्या एका शाही कुटुंबात झाला. आदितीने आपले शालेय शिक्षण आंध्रप्रदेशमध्ये पूर्ण केले तर महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून. वयाच्या सहाव्या वर्षांपासून तिने भरतनाट्यमयचे धडे गिरवायला सुरुवात केली. प्रसिद्ध नृत्यागंणा लीला सैमसन यांची ती शिष्य आहे. अदितीने आपल्या करिअरची सुरुवात तमिळ 2007 साली आलेल्या श्रृंगारम चित्रपटातून केली. या चित्रपटाला तीन नॅशनल अॅवॉर्डदेखील मिळाले. अदितीला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला तो राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी दिल्ली 6 या चित्रपटातून. मात्र अदितीली बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली ती ये साली जिंदगी आणि रॉकस्टर चित्रपटातून. ये साली जिंगदी चित्रपटात अदितीने आपल्या को-स्टारला तब्बल 22 वेळा किस केले होते. या कारणामुळे हा चित्रपट चर्चेत आला होता. वयाच्या सहाव्या वर्षांपासून अदितीने भरतनाट्यमचे धडे गिरवले आहेत. अदितीचे आजोबा राजा जे. रामेश्वर राव तेलंगणाच्या वनापर्थीवर राज्य करायचे. 

अदिती वयाच्या 21 वर्षी सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही. अदिती 17 वर्षांची असताना तिची ओळख सत्यदीपशी झाली होती त्यांनतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 2012मध्ये अदितीने लग्नाविषयी बोलण्याल नकार दिला होता. त्यानंतर 2013मध्ये एक इंटरव्ह्रु दरम्यान घटस्फोट घेतल्याचे सांगितले होते. अदितीच्या आई-वडिलांचाही प्रेमविवाह होता. मात्र ती  दोन वर्षांची असताना घटस्फोट झाला होता. अदितीची कस्टडी तिच्या आईला मिळाली होती. अदितीच्या वडिलांची तिची कस्टडी हवी होती मात्र तिने आपल्या आईची साथ कधीच सोडली नाही. अदितीची आई एक ठुमरी गायिका आहे. 

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या भूमी चित्रपटात अदिती दिसली होती. यात तिने संजय दत्तच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातू बाप-लेकीच्या नात्यावर भाष्य करण्यात आले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.   

Web Title: Birthday Special: The actor was married to Aditi Rao Hydari's 21st year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.