Birthday Special : अ‍ॅक्ट्रेस टू सोशल वर्कर - जाणून घ्या दिया मिर्झाच्या जीवनातील हे रंजक फॅक्टस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2016 11:04 AM2016-12-09T11:04:22+5:302016-12-09T11:58:32+5:30

होईल तेवढी समाजाची सेवा करण्याचं व्रत तिनं स्वीकारलंय. तिच्या जिद्दीला आणि निष्ठेला सलाम !

Birthday Special: Actress to Social Worker - Know These Mirza Factors These Fun Facts | Birthday Special : अ‍ॅक्ट्रेस टू सोशल वर्कर - जाणून घ्या दिया मिर्झाच्या जीवनातील हे रंजक फॅक्टस

Birthday Special : अ‍ॅक्ट्रेस टू सोशल वर्कर - जाणून घ्या दिया मिर्झाच्या जीवनातील हे रंजक फॅक्टस

googlenewsNext
लिवूडचे सितारे हे समाजातील एक घटक असले तरीही समाजात एकरूप होऊन समाजासाठी कार्य करणं सर्वांना झेपण्यासारखं नसतं. केवळ सामाजिक समस्यांवर आधारित जाहीरातींमध्ये काम केलं म्हणजे अमुक एखाद्या कलाकाराला सामाजिक भान आहे, असा समज चुकीचाच. पण, चित्रपटाच्या शूटिंगमधून थोडा वेळ काढून समाजासाठी कार्य करणारे ‘बी टाऊन’चे कलाकार विरळाच. 

समाजकार्य चळवळीतील एक पुढारलेलं नाव म्हणजे दिया मिर्झा. सामाजिक समस्या आणि प्रश्न यांची जाणीव असलेल्या दिया अनेक एनजीओमार्फत काम करते. होईल तेवढी समाजाची सेवा करण्याचं व्रत तिनं स्वीकारलंय. तिच्या जिद्दीला आणि निष्ठेला सलाम !! आज दियाचा वाढदिवस !! 'सीएनएक्स मस्ती' टीमकडून तिला हार्दिक शुभेच्छा...

जन्म व शिक्षण :

दियाचा जन्मदिन ९ डिसेंबर १९८१ आहे. फ्रँक हँडरिच आणि दिपा असे तिच्या आईवडलांचे नाव आहे. वडील जर्मन ख्रिश्चन आणि आई बंगाली हिंदू असल्याने तिच्यावर दोन्ही धर्मांचा प्रभाव आहे. दिया साडेचार वर्षांची असताना तिच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर दोघांनी पुन्हा लग्न केले.

                                    
                                    वडील फ्रँक हँडरिच आणि आई दिपासोबत छोटी दिया.

वयाच्या ९व्या वर्षी वडीलांचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईने अहमद मिर्झासोबत दुसरे लग्न केले. हैदराबाद शहरातील खैरताबादमध्ये तिने ‘विद्यानारायण हायस्कूल’ येथे शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर हैदराबादच्या ‘बॅचलर आॅफ आर्र्ट्स आंबेडकर मुक्त विद्यापीठ’ मध्ये पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. २०१४ मध्ये तिचा बॉयफ्रेंड साहिल संघासोबत १८ आॅक्टोबर २०१४ रोजी दिल्लीच्या छत्तरपूर फार्म येथे लग्न केले. 

बॉलिवूडमधील सुरूवात :

आर. माधवनसोबत ‘रहना हैं तेरे दिल मैं’ या चित्रपटातून दियाने बॉलिवूड डेब्यू केला. त्यानंतर परिणीता, दस, फाईट क्लब, अ‍ॅसिड फॅक्टरी, दम, दिवानापन, तुमसा नही देखा, लगे रहा मुन्नाभाई या चित्रपटात तिने काम केले. अभिनय समजून घेऊन भूमिकेत आपली वेगळी छाप सोडणारी अभिनेत्री म्हणून दियाकडे पाहिले जाते. चित्रपटातून कधी गंभीर तर कधी हलकाफुलका विषयही तिने अतिशय सम्रजसपणाने हाताळला. 

                                    
                                    २०१४ मध्ये तिचा बॉयफ्रेंड साहिल संघासोबत १८ आॅक्टोबर २०१४ रोजी दिल्लीच्या छत्तरपूर फार्म येथे लग्न केले. 

उत्कृष्ट मॉडेल :

दिया मिर्झाने कॉलेजमध्ये असताना मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणूनही काम केलेले आहे. त्याचवेळी तिने  अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या प्रिंट आणि टीव्ही कमर्शियल्ससाठी मॉडेलिंगचे काम केले. दरम्यान, २००० मध्ये तिने ‘मिस एशिया पॅसिफिक’ चा किताबही पटकावला.

‘ग्रीन एन्वाइरमेंट’तर्फे तिला २०१२ मध्ये ‘ग्रीन अ‍ॅवॉर्ड’ मिळाला. महिलांसाठी एचआयव्ही जागरूकता, कॅन्सरच्या रूग्णांसाठी  तिने  विशेष मार्गदर्शन शिबीरे घेतली. ‘नर्मदा बचाओ आंदोलन’लाही तिचा पाठिंबा आहे.

मान-सन्मान :


                                    

                                    मिस इंडिया पॅसिफिक चा किताब स्विकारतांना आणि मित्रमंडळीसोबत धम्माल करताना दिया.

 २००० च्या ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेत ती दुसऱ्या क्रमांकावर निवडण्यात आली. त्यानंतर २०००मध्ये ‘मिस एशिया पॅसिफिक’ ती जिंकली. ‘मिस ब्युटीफुल स्माईल’, ‘मिस अ‍ॅव्हॉन’ आणि ‘मिस क्लोज-अप’ हे सर्व किताब तिने ‘मिस इंडिया’ साठी मिळवले.

मनिला येथे ३ डिसेंबर २००० मध्ये तिने वयाच्या २९ व्या वर्षी ‘मिस एशिया पॅसिफिक’ हा किताब मिळवणारी ती पहिली भारतीय ठरली. २००० मध्ये तिने ‘इंडिया विनिंग इंटरनॅशनल पेजियन्टस’ हा किताब सलग तीनदा पटकावला. 

दियाचे बेस्ट लुक्स :

                            
                            ‘मिस एशिया पॅसिफिक’ चा किताब स्विकारताना दिया मिर्झा.

                             
                             गुड लुक्स अ‍ॅण्ड गॉर्जियस

                             
                             नटखट दिया

                             
                               हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस 

                               
                               शांत, विनम्र दिया
 


काही प्रसिद्ध गाणी :

रब राखा - लव्ह ब्रेकअप जिंदगी


जरा जरा बहकता हैं - रहना हैं तेरे दिल मैं


बिंदिया चमके - तुमको ना भूल पायेंगे


मुझे तुमसे मोहब्बत हैं - तुमसा नही देखा


जीना - दम 


 

Web Title: Birthday Special: Actress to Social Worker - Know These Mirza Factors These Fun Facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.