Birthday Special : त्या एका चुकीच्या निर्णयाने संपले अमिषा पटेलचे फिल्मी करिअर !!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 08:00 AM2019-06-09T08:00:00+5:302019-06-09T08:00:03+5:30

 ‘कहो ना प्यार है’ सारख्या सुपरहिट सिनेमापासून आपल्या फिल्मी करिअरचा प्रवास सुरु करणा-या अमिषाच्या पदरी लीड अभिनेत्री म्हणून केवळ तीन ते चार सिनेमे जमा आहेत. 

Birthday Special: Amisha Patel's film career ended with a wrong decision | Birthday Special : त्या एका चुकीच्या निर्णयाने संपले अमिषा पटेलचे फिल्मी करिअर !!

Birthday Special : त्या एका चुकीच्या निर्णयाने संपले अमिषा पटेलचे फिल्मी करिअर !!

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या अमिषाकडे काम नाही. आता  तर लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी तिला बोल्ड फोटोशूटची मदत घ्यावी लागत आहे.

सन २००० मध्ये ‘कहो ना प्यार है’ सारखा सुपरडुपर हिट सिनेमा देणारी अभिनेत्री अमिषा पटेल हिचा आज (९ जून)  वाढदिवस. ‘कहो ना प्यार है’ या अमिषाच्या पहिल्याच चित्रपटाने  तरुणांना अक्षरश: वेड लावले होते. तुम्हाला ठाऊक असेलच की, या चित्रपटासाठी अमिषा ही पहिली चॉईस नव्हतीच. राकेश रोशन यांनी त्यांचा मुलगा हृतिक रोशनला लॉन्च करण्यासाठी ‘कहो ना प्यार है’ बनवण्याचा निर्णय घेतला आणि या चित्रपटासाठी करिना कपूरचे नाव फायनल केले. पण ऐनवेळी आईच्या सल्ल्यानुसार करिनाने हा चित्रपट करण्यास नकार दिला. करिनाच्या नकारानंतर राकेश रोशन यांनी या चित्रपटासाठी नव्या चेह-याचा शोध सुरु केला. याचदरम्यान कुणीतरी त्यांना अमिषाचे नाव सुचवले. राकेश रोशन अमिषाला भेटले आणि तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्या हुशारीवर फिदा झालेत. तिच्या विचारांनी ते इतके प्रभावित झालेत की, ‘कहो ना प्यार है’साठी त्यांनी तिला साईन केले.

‘कहो ना प्यार है’ने पुढे इतिहास रचला. या सिनेमाने अभिनेता हृतिक रोशनला एका रात्रीत स्टार बनवले, तर अमिषा पटेललासुद्धा बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख प्राप्त करुन दिली.  पुढच्याच वर्षी ‘गदर एक पे्रमकथा’ हा तिचा दुसरा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमाही सुपरडूपर हिट ठरला. या सिनेमातील चुलबुली शकीनाच्या भूमिकेमुळे अमिषाच्या लोकप्रियतेत वाढ झाली होती. 

या दोन चित्रपटांनी अमिषा स्टार तर झाली. पण हे स्टारडम तिला सांभाळता आले नाही. त्याकाळात अमिषाने ‘सिलेक्टीव्ह’ होण्याऐवजी एकापाठोपाठ एक डझनभर सिनेमे साईन केलेत. यातले बहुतेक सिनेमे आपटलेत आणि अमिषाच्या करिअरची नौका डळमळू लागली.

या झटक्यातून सावरायला तिला तीन वर्षे लागलीत. २००६ मध्ये अब्बास मस्तानच्या ‘हमराज’ने तिच्या करिअरला काहीसा आधार दिला. पण तोपर्यंत अमिषाचे स्टारडम संपले होते.

सध्या अमिषाकडे काम नाही. आता  तर लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी तिला बोल्ड फोटोशूटची मदत घ्यावी लागत आहे.  ‘कहो ना प्यार है’ सारख्या सुपरहिट सिनेमापासून आपल्या फिल्मी करिअरचा प्रवास सुरु करणा-या अमिषाच्या पदरी लीड अभिनेत्री म्हणून केवळ तीन ते चार सिनेमे जमा आहेत. 
 

Web Title: Birthday Special: Amisha Patel's film career ended with a wrong decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.