Birthday Special : कुठल्या चित्रपटापेक्षा कमी नाही अनुपम खेर व किरण खेर यांची लव्हस्टोरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 07:24 AM2018-03-07T07:24:25+5:302018-03-07T12:54:25+5:30
बॉलिवूडचे हरहुन्नरी अभिनेते अनुपम खेर यांचा आज (७ मार्च) वाढदिवस. शिमला येथे ७ मार्च १९५५ रोजी अनुपम यांचा जन्म ...
ब लिवूडचे हरहुन्नरी अभिनेते अनुपम खेर यांचा आज (७ मार्च) वाढदिवस. शिमला येथे ७ मार्च १९५५ रोजी अनुपम यांचा जन्म झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपल्याला अभिनयचं करायचा, हे अनुपम यांनी पक्के ठरवले होते. यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. येथील शिक्षण पूर्ण करत १९७८ मध्ये अनुपम यांनी रंगमंचावर पदार्पण केले. रंगमंच गाजवत असतानाचं बॉलिवूडमध्ये अभिनेता होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि या स्वप्नाचा पाठपुरावा करत, ते मुंबईला आले. पण स्वप्नांच्या या नगरीत त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. १९८२ साली ‘आगमन’ या चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली खरी, पण, हा सिनेमा पुरता अयशस्वी ठरला. यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९८४ साली अनुपम यांना महेश ‘सारांश’ हा सिनेमा मिळाला अन् अनुपम यांनी या संधीचे सोने केले. यात त्यांनी साकारलेली अकाली मरणाºया मुलाच्या बापाची भूमिका अजरामर ठरली. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. पुढे एकापेक्षा एक सरस आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिका करत, अनुपम यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवला. त्यांनी खलनायक साकारला तसाच विनोदी नटही साकारला.
अनेक हॉलिवूड चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. छोट्या पडद्यावरही त्यांची पसंती कमालीची वाढली. ‘से ना समथिंग टू अनुपम अंकल’ आणि ‘सवाल दस करोड का’ असे शो त्यांनी होस्ट केले. २००३ साली ‘ओम जय जगदीश’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. अर्थात हा चित्रपट यश मिळवू शकला नाही. २००५ साली अनुपम खेर यांनी ‘मैने गांधी को नहीं मारा‘ निर्मित केला. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना कराची फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाला.
चित्रपटांप्रमाणेच अनुपम खेर यांचे लव्ह लाईफही चर्चेत राहिले. अनुपम व किरण खेर यांची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. दोघांचेही पहिले लग्न अयशस्वी ठरले. पहिल्या लग्नानंतर काही वर्षांनी दोघेही पुन्हा भेटले आणि त्यांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली. १९८५ मध्ये दोघांनीही लग्न केले.
किरण व अनुपम यांची भेट चंदीगडमध्ये झाली होती. दोघेही चंदीगड थिएटर ग्रूपमध्ये काम करायचे. यादरम्यान दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. एका मुलाखतीत किरण यांनी सांगितले होते की, असे काहीही नव्हते जे अनुपमला माझ्याबद्दल ठाऊक नव्हते. त्याच्याबद्दलही मला सगळे काही माहित होते. पण तेव्हा आमच्यात केवळ मैत्री होती. त्यापलीकडे काहीही नव्हते.
१९८० मध्ये किरण चंदीगडवरून मुंबईला आल्या. येथे त्यांची ओळख बिझनेसमॅन गौतम बेरीसोबत झाली. पुढे दोघांनीही लग्न केले. लग्नानंतर वर्षभरातच किरण आई झाली. सिकंदर खेर हा किरण आणि गौतम यांचा मुलगा आहे. सिकंदर चार पाच वर्षांचा असतानाच या लग्नात आपण आनंदी नाही, हे किरण व गौतम दोघांनाही कळून चुकले होते.
तिकडे १९७९ मध्ये अनुपम यांनी कुटुंबाच्या आग्रहावरून मधुमालती नामक मुलीसोबत लग्न केले. पण ते दोघेही आपल्या नात्यात आनंदी नव्हते. याचदरम्यान नादिरा बब्बर यांच्या एका नाटकासाठी किरण व अनुपम दोघेही कोलकात्यात गेले. येथे त्यांची अनेक वर्षांनी पुन्हा भेट झाले. नाटक संपल्यावर अनुपम यांनी किरण यांना प्रपोज केले. आधी तर अनुपम विनोद करताहेत, असे किरण यांना वाटले. पण नंतर आपल्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे, हे त्यांना कळून चुकले. पुढे दोघेही एकमेकांना भेटू लागले आणि त्यांच्यातील प्रेम वाढत गेले. यानंतर दोघांनीही आपआपल्या पार्टनरसोबत घटस्फोट घेऊन १९८५ मध्ये लग्न केले. अनुपम यांनी किरण यांचा मुलगा सिकंदर यांना स्वीकारत त्याला आपले नावही दिले.
ALSO READ : चक्क पोर्न वेबसाइटवर बघावयास मिळतो अनुपम खेरचा ‘हा’ चित्रपट!!