Asha Sachdev: मुस्लिम कुटुंबात जन्म, मग हिंदू कशा झाल्या आशा सचदेव?, एका निर्णायाने बर्बाद झालं करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 10:55 AM2023-05-27T10:55:12+5:302023-05-27T10:58:27+5:30

त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अभिनेते आणि दिग्दर्शकांची रांग लागली होती पण अभिनेच्या एका निर्णयाने सगळंच उद्धवस्त झालं.

Birthday special asha sachdev born in muslim family but hindu name know about struggle films | Asha Sachdev: मुस्लिम कुटुंबात जन्म, मग हिंदू कशा झाल्या आशा सचदेव?, एका निर्णायाने बर्बाद झालं करिअर

Asha Sachdev: मुस्लिम कुटुंबात जन्म, मग हिंदू कशा झाल्या आशा सचदेव?, एका निर्णायाने बर्बाद झालं करिअर

googlenewsNext

70 आणि 80 च्या दशकातील सुंदर अभिनेंचा उल्लेख करताना आशा सचदेव यांच्या नावाशिवाय ही यादी पूर्ण होऊच शकत नाही. आपल्या काळ्या डोळ्यांनी आणि सौंदर्यानी त्यांनी सगळ्यांना मोहित केलं होतं. आशा सचदेव यांचा जन्म २७ मे १९५६ रोजी झाला. 40 वर्षांच्या कारकिर्दीत आशाने 90 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले.

मुस्लिम कुटुंबात झाला जन्म 
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की आशाचा यांचा जन्म मुंबईत राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबात झाला होता. त्यांचे पहिले नाव नफिसा सुलतान होते, ते बदलून आशा सचदेव असे ठेवण्यात आले. आशा सचदेव  यांचा अर्शद वारसी हा सावत्र भाऊ आहे. याचा अर्थ आशा आणि अर्शदचे वडील एकच आहेत पण आई वेगळी आहे. वास्तविक, नफीसा उर्फ ​​आशाचे वडील आशिक हुसैन वारसी लेखक होते, तर तिची आई रझिया यांनीही चित्रपटांमध्ये काम केले होते. आशिक आणि रझिया यांना तीन मुले होती, त्यानंतर 60 च्या दशकात दोघांचा घटस्फोट झाला.

असे बदलण्यात आलं नाव 
घटस्फोटानंतर, नफीसा आणि तिची धाकटी बहीण त्यांच्या आई रझिया यांच्यासोबत राहिल्या, तर भाऊ अन्वर वडील आशिक हुसैन यांच्यासोबत राहायला गेले. काही काळानंतर रझिया यांनी मुंबईतील प्रसिद्ध वकील आयपी सचदेव यांच्याशी लग्न केले. या लग्नानंतर नफीसा सुलतान यांचं नाव आशा सचदेव ठेवण्यात आले आणि बहिणीचे नाव बदलून रेश्मा सचदेव ठेवण्यात आले.

आशा यांनाही आईसारखा अभिनय करायचा होता. त्यांनी पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या मुंबईत आल्या आणि चित्रपटात नशीब आजमावू लागल्या.  त्या काळातील सर्व प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शकांना त्यांच्यासोबत काम करायचे  होते. या यादीत महेश भट्ट यांचेही नाव होते.

त्यादरम्यान आशा यांनी असे एक पाऊल उचलले, जे त्यांच्या करिअरसाठी घातक ठरले. 1972 मध्ये आशा यांनी स्मॉल बजेट बी-ग्रेड चित्रपट 'बिंदिया और बंदूक'मध्ये काम केले होते. या चित्रपटातील आशा यांच्या अभिनयाचे कौतुक झाले खरं, परंतु बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे त्यांची इमेज खराब झाली. त्यांच्या हातातून बिग बजेट चित्रपट निघून गेले.

Web Title: Birthday special asha sachdev born in muslim family but hindu name know about struggle films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.