Birthday Special : अशी आहे बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरची क्यूट लव्हस्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 02:50 PM2021-01-07T14:50:39+5:302021-01-07T14:57:33+5:30

हॉट आणि सेक्सी कपल अशी ओळख असणाऱ्या करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते.

Birthday Special : Bipasha basu karan singh grover love story | Birthday Special : अशी आहे बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरची क्यूट लव्हस्टोरी

Birthday Special : अशी आहे बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरची क्यूट लव्हस्टोरी

googlenewsNext
ठळक मुद्देअलोन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते.त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

आज बिपाशा बासूचा वाढदिवस असून तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. तिच्या सौंदर्याची तर नेहमीच चर्चा रंगते. तिचे चाहते तिला सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता. या सिनेमासाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत तिला नामांकन मिळाले होते. त्यानंतर २००५ मध्ये आलेला नो एन्ट्री हा सिनेमासुद्धा हिट ठरला होता. बिपाशाने जवळजवळ ५५ सिनेमांमध्ये अभिनय केला. पण गेल्या काही वर्षांत बिपाशाला एकही हिट चित्रपट मिळालेला नाहीये.

अभिनेत्री असण्यासोबतच बिपाशा एक डिझाईनरही आहे. बिपाशाचा शूज, कपडे आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हरची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. अलोन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते.त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरते. विशेषतः तिसरं लग्न केल्याने करण सिंगला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. बिपाशादेखील लग्न व्हायच्याआधी जॉन अब्राहमसोबत नात्यात होती. त्यांचे अफेअर जवळजवळ दहा वर्षं सुरू होते. ते लग्न करणार असे त्यांच्या फॅन्सना वाटत असतानाच त्यांनी ब्रेकअप करत त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला. बिपाशाने एका मुलाखतीत सांगितले होते की, बिपाशाला लग्न करून आयुष्यात सेटल व्हायचे होते. पण जॉनचा लग्न करण्याचा विचार नव्हता. त्यामुळे त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता.

हॉट आणि सेक्सी कपल अशी ओळख असणाऱ्या करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. बिपाशा आणि करणच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला त्या दोघांचे हॉट फोटो पाहायला मिळतात. यातून ते दोघे किती खूश आहेत हे आपल्याला लगेचच कळते. 

Web Title: Birthday Special : Bipasha basu karan singh grover love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.