भूमी पेडणेकरला अ‍ॅक्टिंग स्कूलमधून दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता, अशी झाली होती अभिनेत्रीची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 12:24 PM2023-07-18T12:24:48+5:302023-07-18T12:27:06+5:30

'दम लगा के हैश्शा' या आपल्या पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या भूमीला अ‍ॅक्टिंग स्कूलमधून काढून टाकण्यात आलं होतं.

Birthday special bollywood actress bhumi pednekar struggle career films lifestyle family unknown facts | भूमी पेडणेकरला अ‍ॅक्टिंग स्कूलमधून दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता, अशी झाली होती अभिनेत्रीची अवस्था

भूमी पेडणेकरला अ‍ॅक्टिंग स्कूलमधून दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता, अशी झाली होती अभिनेत्रीची अवस्था

googlenewsNext

अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) बॉलिवूडमध्ये स्वत:च्या मेहनतीने आणि टॅलेंटच्या जोरावर ओळख बनवली आहे. 'दम लगा के हैश्शा' या आपल्या पहिल्याच सिनेमातून तिने प्रेक्षकांवर छाप पाडली. सहज अभिनय आणि उत्तम स्क्रिप्टवर तिने काम केलं आहे. अभिनेत्री बनण्यापूर्वी भूमी यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डिरेक्टर शानूची असिस्टंट होती.  खूप कमी लोकांना माहिती आहे की या यशासाठी भूमिला संघर्ष करावा लागला आहे.

१८ जुलै १९८९ मध्ये मुंबईत भूमीचा जन्म झाला. त्यामुळे आज भूमी तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसानिमित्त तिच्याविषयीचे अनेक unknow fact समोर येत आहेत. अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या भूमीचे वडील मोठे राजकीय व्यकी होते. इतकंच नाही तर तिची आईदेखील सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

भूमी पेडणेकर ही महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि कामगार मंत्री सतीश पेडणेकर यांची लेक आहे. तर, भूमीची आई सुमित्रा हुडा पेडणेकर या तंबाखूविरोधी कार्यकर्त्या आहेत. सतीश पेडणेकर यांना तोंडाचा कर्करोग झाल्यामुळे त्यांचं निधन झालं.

भूमीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्याची आवड पाहून त्याच्या पालकांनी भूमीला शैक्षणिक कर्ज घेऊन एका चांगल्या अभिनय शाळेत प्रवेश मिळवून दिला. अभिनयाच्या एवढ्या प्रेमात असतानाही एकदा भूमीला अभिनयाच्या शाळेतून काढून टाकण्यात आले होते. असे झाले की भूमीची उपस्थिती खूपच कमी होती, त्यामुळे तिला शाळेतून काढून टाकण्यात आले. यानंतर तिने यशराज फिल्म्समध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून जॉइन केले आणि तिचे शैक्षणिक कर्ज फेडले..तिने दम लगा के हईशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Web Title: Birthday special bollywood actress bhumi pednekar struggle career films lifestyle family unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.