Birthday Special : ‘मर्डर’ पाहिल्यानंतर अशी होती इमरान हाश्मीच्या पत्नीची रिअॅक्शन, वाचून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 08:00 AM2020-03-24T08:00:00+5:302020-03-24T08:00:11+5:30
बॉलिवूडमध्ये ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मी याचा आज वाढदिवस.
एकापाठोपाठ एक चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स देणारा आणि यामुळे बॉलिवूडमध्ये ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मी याचा आज वाढदिवस. ‘फुटपाथ’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणा-या इमराने जवळपास आपल्या प्रत्येक सिनेमात किसींग सीन दिला आहे. इमरानचे हे किसींग सीन्स पाहून त्याची पत्नी परवीन साहनी कशी रिअॅक्ट करते? असा प्रश्न अनेकांना पडत असावा. आज इमरानबद्दल अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
इमरान हाश्मी प्रत्येक भूमिकेत अगदी फिट बसतो. अॅक्शनपासून तर रोमॅन्टिक अशा अनेक भूमिका त्याने केल्या आहेत. 2003 मध्ये ‘फुटपाथ’ या सिनेमातून इमरानने डेब्यू केला आणि यानंतर अनेक चित्रपटांत तो झळकला. पण ‘फुटपाथ’ या सिनेमाआधी एक सिनेमा इमरानला ऑफर झाला होता. पण या पहिल्याच सिनेमातून इमरानची हकालपट्टी करण्यात आली होती. होय, तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल पण इमरानला त्याचा पहिला सिनेमा 2001 मध्येच मिळाला होता. या चित्रपटाचे नाव होते, ‘ये जिंदगी का सफर’. मात्र ऐनवेळी इमरानला या सिनेमातून काढण्यात आले. होय, इमरान या चित्रपटातील रोलसाठी फिट नाही, असे मेकर्सला वाटले आणि त्यांनी ऐनवेळी इमरानचा पत्ता कट केला.
नाव बदलले
बॉलिवूडमध्ये इमरानला ‘सीरिअल किसर’ नावाने ओळखले जाते. पण बॉलिवूडमध्ये येण्याआधी इमरानने त्याचे नाव बदलून ‘फरहान’ ठेवले होते. होय, पण ‘फरहान’ नावाची जादू चालली नाही आणि इमरानने पुन्हा इमरान हे आधीचे नाव धारण केले.
आणि पत्नी संतापली
2004 मध्ये आलेला ‘मर्डर’ हा सिनेमा इमरानचा दुसरा सिनेमा होता. या सिनेमातील इमरानच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. सिनेमा हिटही झाला. चित्रपट हिट झाल्याचा आनंद होताच. त्यामुळे इमरानने आपला हा सिनेमा इमरान पत्नी परवीन व आजीला दाखवायचे ठरवले. इमरानची पत्नी आनंदात होती.
चित्रपट कसा आहे, याबद्दल तिला काहीही कल्पना नव्हती. चित्रपट सुरु झाला. इमरानचा हात हातात घेऊन परवीन चित्रपट पाहू लागली. पण चित्रपटात इमरानने मल्लिकासोबत दिलेले बोल्ड सीन्स पाहून परवीन इतकी नाराज झाली की, तिने आपल्या नखांनी इमरानचा हात अक्षरश: ओरबाडून लाल केला होता. इमरानची आजीही संतापली होती. खुद्द इमरानने हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता.