Birthday Special:फरदीन खानसाठी बॅकग्राऊंड मॉडल बनली होती दीपिका पदुकोण, आज आहे सर्वात महागडी अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 03:38 PM2021-01-05T15:38:02+5:302021-01-05T15:38:43+5:30
2007 मध्ये ओम शांती ओम या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या सिनेमात तिला बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत झळकण्याची संधी मिळाली होती.
सोशल मीडियापैकी इन्स्टाग्राम हे अनेक सेलिब्रिटींचं आवडतं. इन्स्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटी अॅक्टिव्ह असून ते इथे आपले फोटो, व्हिडिओ आणि जीवनातील क्षण शेअर करत असतात. बॉलिवूडची मस्तानी दीपिकाचाही सोशल मीडियावर बोलबाला असतो. दीपिका पदुकोण हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 35 वर्षे पूर्ण केली आहेत.
दीपिकाचा एक जुना फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. या फोटोत दीपिका फरदीन खानसह तिचा एका फोटो व्हायरल झाला आहे. २००५ साली एका एव्हेंटमधला आहे. यावेळी दीपिका बॅकग्राउंड मॉडल म्हणून इतर मुंलींसह रॅम्पवॉक करताना दिसली होती.
एकेकाळी फरदीनसाठी बॅकग्राऊंड मॉडेल बनलेली तीच दीपिका आज बॉलीवुडची मस्तानी म्हणून ओळखली जाते. सगळ्यात महागड्या अभिनेत्रीच्या यादीत ती आघाडीवर आहे.
2007 मध्ये ओम शांती ओम या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या सिनेमात तिला बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत झळकण्याची संधी मिळाली होती. या सिनेमासाठी दीपिकाला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
पहिल्याच सिनेमातून दीपिकाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि त्यानंतर तिला एकामागून एक हिट सिनेमाच्या ऑफर मिळत गेल्या. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. विशेष म्हणजे ओम शांत ओम सिनेमा करण्यापूर्वी दीपिका हिमेश रेशमियाँचा म्युझिक अल्मब नाम है तेरा तेरा'मध्येही झळकली होती.त्याचवेळी फराह खानने तिला पहिल्यांदाच पाहिले होते, तिला पाहताच तिला सिनेमात करण्याची ऑफर दिली होती.
‘ओम शांती ओम’वेळी अनेकांनी उडवली होती दीपिका पादुकोणची खिल्ली...!
दीपिकाने सांगितले, ‘मॉडेलिंगमध्ये काही वर्षे घालवल्यानंतर मला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला. ओम शांती ओम हा सिनेमा मिळाला तेव्हा मी 19 वर्षांचे होते. अनेक बाबतीत कच्ची होते, अज्ञानी होते. पण शाहरूखने मला खूप मदत केली. माझा पहिलाच सिनेमा सुपरहिट झाला. पण याचवेळी काही लोक माझी खिल्ली उडवत होते. ओह, ही तर मॉडेल आहे, अॅक्टिंग हिला काय जमणार, असे टोमणे मला ऐकायला मिळत होते.
माझ्या एक्सेंटचीही खिल्ली उडवली जात होती. माझ्या व माझ्या अभिनयाबद्दल मला नाही नाही ते त्यावेळी ऐकावे लागले. आजही मला त्याचे दु:ख आहे. 20 व्या वर्षी अशाप्रकारची टीका, टोमणे तुमचे आयुष्य प्रभावित करते. मात्र पुढे हीच टीका माझी प्रेरणा बनली. यामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वात अनेक बदल करण्याची प्रेरणा मला मिळाली. ’