Birthday special : ​बाप आणि मुलगा दोघांचीही हिरोईन बनली डिंपल कपाडिया!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2017 05:58 AM2017-06-08T05:58:21+5:302017-06-08T11:28:21+5:30

आज (८ जून) अभिनेत्री डिम्पल कपाडिया हिचा वाढदिवस. मादक सौंदयार्मुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या डिंपलने आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध करण्यासाठी चित्रपट ...

Birthday special: Dimple Kapadia became the heroine of both father and son! | Birthday special : ​बाप आणि मुलगा दोघांचीही हिरोईन बनली डिंपल कपाडिया!

Birthday special : ​बाप आणि मुलगा दोघांचीही हिरोईन बनली डिंपल कपाडिया!

googlenewsNext
(८ जून) अभिनेत्री डिम्पल कपाडिया हिचा वाढदिवस. मादक सौंदयार्मुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या डिंपलने आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध करण्यासाठी चित्रपट निवडित अधिक चोखंदळता दाखवली. डिंपल कालांतराने अधिक गंभीर भूमिकांत प्रेक्षकांसमोर आली आणि समांतर सिनेमांकडे वळली. 



८ जून १९५७ रोजी डिंपलचा जन्म झाला. तिचे वडिल चुन्नीभाई कपाडिया एक धनाढ्य व्यक्ती होते. चुन्नीभाई आपल्या ‘समुद्र महल’ या घरात मोठ मोठ्या पार्ट्या द्यायचे. या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या बड्या बड्या स्टार्सचा राबता असायचा. अशाच एका पार्टीत राजकुमार यांची नजर १३ वर्षांच्या डिंपलवर पडली. राजकुमार यांनी डिंपलला घेऊन चित्रपट काढण्याची इच्छा व्यक्त केली. चुन्नीभार्इंनी काही वेळ मागून घेतला.



अखेर वयाच्या सोळाव्या वर्षी राज कूपर यांच्या ‘बॉबी’ या चित्रपटात डिंपल झळकली. या चित्रपटातून राजकपूर यांनी ऋषी कपूरलाही लॉन्च केले. हा चित्रपट सुपरडुपर हिट राहिला. ‘बॉबी’मध्ये डिंपलने एका साध्या-भोळ्या मुलीची भूमिका केली. पण अतिशय मॉडर्न पद्धतीने. या चित्रपटात ती शॉर्ट स्कर्टमध्ये दिसली. मग काय लोक तिच्या बोल्ड डिंपलच्या प्रेमात पडलेत. यानंतर अनेक डायरेक्टर डिंपलला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सूक होते. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते.



‘ बॉबी’ रिलीज होण्याआधीच डिंपलची ओळख राजेश खन्नांश्ी झाली. राजेश खन्ना डिंपलच्या प्रेमात आकंठ बुडाले. इतके की ‘बॉबी’ रिलीज होण्याआधीच त्यांनी डिंपलसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. डिंपलही राजेश खन्नाची ‘दिवानी’ होती. लग्नाचा प्रस्ताव ती नाकारू शकली नाही आणि डिंपलने स्वत:पेक्षा १५ वर्षे मोठ्या राजेश खन्नांशी लग्न केले.



खरे तर ‘ बॉबी’ हिट झाल्यावर डिंपलच्या घरासमोर दिग्दर्शकांची रांग लागली होती. पण राजेश खन्ना यांनी डिंपलला लग्नानंतर चित्रपटांत काम करण्यास मनाई केली होती. यामुळे डिंपलने बॉलिवूड व अभिनयापासून फारकत घेतली. राजेश खन्ना व डिंपल यांना दोन मुली झाल्यात. पण १९८२ मध्ये डिंपल व राजेश खन्ना यांच्यात मतभेद निर्माण झाले. दोघेही विभक्त होण्यापर्यंत हे वाद विकोपाला गेले.   १९८४ मध्ये राजेश खन्नापासून विभक्त झाल्यावर ती पुन्हा अभिनयाकडे वळली.यानंतर विश्वास बसणार नाही पण डिंपलने हिट चित्रपटांची रांग लावली. ११ वर्षांनंतर डिंपलचा  ‘जख्मी शेर’ हा दुसरा चित्रपट आला. यांनर ‘ऐतबार’, ‘लावा’, ‘अर्जुन’, ‘सागर’, ‘पाताल भैरवी’, ‘जाबांज’, ‘इंसानियत का दुश्मन’, ‘काश’, ‘साजिश’, ‘राम लखन’ असे अनेक हिट चित्रपट तिने दिलेत.  ‘सागर’  (१९८५) चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.



 ‘काश’ , ‘द्रिष्टी’,‘लेकिन’ आणि‘रुदाली’  या समांतर सिनेमांमधील तिच्या भूमिकांसाठी तिची विशेष नोंद घेतली गेली. ‘रुदाली’साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समिक्षक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९३ मध्ये आलेल्या ‘गर्दिश’ मधील तिची सहाय्यक भूमिका लक्षणिय ठरली आणि ‘क्रांतीवीर’ मधील तिच्या भूमिकेसाठी तिला चौथा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.





डिंपल कपाडिया एक अशी अभिनेत्री आहे, जिने बॉलिवूडमध्ये बाप आणि मुलासोबत वेगवेगळ्या चित्रपटात हिरोईन म्हणून काम केले. होय, आधी डिंपल धर्मेन्द्र यांची हिरोईन बनली आणि यानंतर धर्मेन्द्र यांचा मुलगा सनी देओल याच्याशीही ती आॅनस्क्रीन रोमान्स करताना झळकली. सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या लव्ह अफेअरच्या बातम्या त्या काळात बºयाच गाजल्या. अर्थात दोघांनीही या चर्चा नाकारल्या. याचदरम्यान काही वर्षांनंतर डिंपल व राजेश खन्ना यांच्यातील दुरावाही हळू हळू कमी व्हायला लागला. डिंपलने राजकीय आखाड्यातही राजेश खन्ना यांना सोबत दिली.



डिंपल कपाडिया अद्यापही अभिनय करते आहे. पण सोबतच तिचा मेणबत्ती डिझाईनचा बिझनेस आहे. तिने डिझाईन केलेल्या मेणबत्त्या मोठ्या किमतीत विकल्या जातात.

Web Title: Birthday special: Dimple Kapadia became the heroine of both father and son!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.