Birthday Special:अनुपम खेर यांच्याविषयी ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 13:11 IST2019-03-07T13:10:37+5:302019-03-07T13:11:04+5:30

'हम आपके कौन है' या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान अनुपम खेर यांना पॅरालिसिस (लकवा) चा झटका आला होता. डॉक्टरांनी त्यावेळी 2 महिने काम बंद करण्याचा सल्लाही दिला होता.

Birthday Special: Do you know this about Anupam Kher? | Birthday Special:अनुपम खेर यांच्याविषयी ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

Birthday Special:अनुपम खेर यांच्याविषयी ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

रसिकांच्या मनात अनुपम खेर यांचं वेगळं स्थान आहे. 'सांराश' सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या अनुपम खेर यांचा जीवनप्रवास कधीच सोपा नव्हता. मात्र सारांश सिनेमानंतर आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि अभिनयामुळे त्यांनी रसिकांची मनं जिंकली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मात्र करियरच्या ऐन भरात असताना आणि विविध सिनेमा हातात असताना एक घातक प्रसंग अनुपम खेर यांच्यावर ओढवला. 


'हम आपके कौन है' या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान अनुपम खेर यांना पॅरालिसिस (लकवा) चा झटका आला होता. डॉक्टरांनी त्यावेळी 2 महिने काम बंद करण्याचा सल्लाही दिला होता. मात्र डॉक्टरकडून तपासणी झाल्यानंतर अनुपम खेर थेट हम आपके कौन है सिनेमाच्या शूटिंगसाठी पोहचले. अनुपम खेर यांचा वाकडा झालेला चेहरा पाहून कुणालाच काही समजलं नाही. सलमान खान आणि माधुरीला तर वाटले की ते मस्करी करत आहेत. मात्र सत्य सांगितल्यानंतर सिनेमाची टीम हादरली होती. अशा परिस्थितीतही अनुपम खेर यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. सिनेमाचं शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 


चेहरा वाकडा असतानाही त्यांनी 'हम आपके है कौन' सिनेमाचं शूटिंग केलं. त्यामुळेच या सिनेमाच्या सीन्समध्ये अनुपम खेर यांचा एकही क्लोज शॉट घेण्यात आलेला नाही. एका सीनमध्ये मात्र अनुपम खेर यांचा चेहरा वाकडा झाल्याचं सिनेमा पाहताना दिसतं. एका सीनमध्ये अनुपम खेर यांनी शोलेतील धर्मेंद्रच्या वीरुप्रमाणे दारु प्यायल्याची अॅक्टिंग केली होती. या सीनमध्येच फक्त अनुपम खेर यांचा चेहरा वाकडा झाल्याचं दिसतं. त्या सीनमध्ये चेहरा वाकडा असूनही ते अॅक्टिंगच करत असल्याचे आजही रसिकांना वाटतं.
 

Web Title: Birthday Special: Do you know this about Anupam Kher?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.