Birthday Special: ​तिनदा प्रेमात पडूनही आयुष्यभर एकाकी राहिली परवीन बाबी...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2017 06:26 AM2017-04-04T06:26:35+5:302017-04-04T11:56:35+5:30

७० व ८० च्या दशकात बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगतात कुठल्या सौंदर्यवतीचा जलवा होता? तर ती होती, परवीन बाबी. होय, हॉट, ...

Birthday Special: Even after falling in love with him, he remained lonely forever. | Birthday Special: ​तिनदा प्रेमात पडूनही आयुष्यभर एकाकी राहिली परवीन बाबी...

Birthday Special: ​तिनदा प्रेमात पडूनही आयुष्यभर एकाकी राहिली परवीन बाबी...

googlenewsNext
व ८० च्या दशकात बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगतात कुठल्या सौंदर्यवतीचा जलवा होता? तर ती होती, परवीन बाबी. होय, हॉट, ग्लॅमरस, बोल्ड परवीन बाबीने सिनेप्रेमींना अक्षरश: वेड लावले होते. ४ एप्रिल १९४९ रोजी गुजरातच्या जुनागढ येथे जन्मलेली परवीन राजघराण्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. आज (४ एप्रिल) तिचा वाढदिवस. जाणून घेऊ यात, तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...



परवीन बाबी तिच्या माता-पित्यांची एकुलती एक मुलगी होती. पण लहान वयात परवीनच्या डोक्यावरचे पिताछत्र हरवले. पण स्वप्नांचा ध्यास घेतलेल्या परवीनने हार मानली नाही. २३ वर्षांच्या वयात परवीन मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीनने बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘दीवार’,‘नमक हलाल’,‘अमर अकबर अँथोनी’, ‘शान’ यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले.





परवीनचा पहिला चित्रपट दणकून आपटला. पण परवीनने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिच्या वेस्टर्न लूकचे सगळेच दिवाने झालेत. याच काळात डॅनी परवीनच्या आयुष्यात आला. पण हे नाते फार काळ चालले नाही.



अमिताभ बच्चनसोबत तिची जोडी हिट झाली. अमिताभसोबत परवीनने आठ चित्रपटांत काम केले. हे सर्व चित्रपट हिट ठरले.
बॉलिवूडमध्ये यशाची दहा वर्षे पूर्ण होत नाही तोच १९८३ मध्ये परवीन अचानक गायब झाली. काहींच्या मते, या काळात ती आध्यात्मिक शांतीच्या शोधात दूर निघून गेली होती. १९८९ मध्ये परवीन पुन्हा परतली. पण तोपर्यंत ती इतकी बदलली होती की, लोक तिला ओळखूही शकत नव्हते.



मीडियानुसार, परवीन मानसिक आजाराने ग्रस्त होती. अमिताभ बच्चनने माझ्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करून परवीनने अचानक खळबळ उडवून दिली होती. अखेरच्या काळात परवीनने धर्म बदलला होता, असेही म्हटले जाते. मुस्लिम धर्म त्यागून तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे बोलले जाते.



परवीनने लग्न केले नाहीत. पण तिची अनेक अफेअर गाजलीत. परवीनला तिनदा प्रेम झाले. महेश भट्ट, अभिनेता कबीर बेदी आणि डॅनी डेंजोंग्पा हे परवीनच्या आयुष्यात आलेले चर्चित पुरूष. अमिताभसोबतही तिचे नाव जोडले गेले. महेश भट्टसोबतचा तिचा लव्ह सीन बरीच वर्षे चालला. महेश भट्ट यांनी त्यांच्या व परवीनच्या आयुष्यावर आधारित ‘लम्हें’ हा चित्रपटही काढला.



आयुष्यभर एकाकीपण भोगलेल्या परवीनचा शेवट अतिशय दुर्दैवी झाला. २२ जानेवारी २००५ रोजी मुंबईच्या जुहूस्थित घरात तिचा कुजलेला मृतदेह आढळून आला. फ्लॅटबाहेर पडलेली दुधाची पाकिटे आणि वृत्तपत्रांचा ढीग बघून शेजाºयांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिस दार तोडून आत गेले असता परवीनचा कुजलेला मृतदेह त्यांना सापडला. परवीन डायबेटिज आणि पायाच्या गँगरिनने पीडित होती. यामुळे तिच्या शरिरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले आणि एका बंद खोलीत परवीनने अखेरचा श्वास घेतला.



Web Title: Birthday Special: Even after falling in love with him, he remained lonely forever.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.