Birthday Special : १५ वर्षांचा संसार मोडल्यानंतर फरहान पडला या मॉडेलच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 17:17 IST2020-01-09T17:17:00+5:302020-01-09T17:17:20+5:30
काही दिवसांपूर्वी फरहान अख्तर रिलेशनशीपमुळे चर्चेत होता.

Birthday Special : १५ वर्षांचा संसार मोडल्यानंतर फरहान पडला या मॉडेलच्या प्रेमात
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरचा आज वाढदिवस असून सध्या तो आगामी चित्रपट 'तुफान'च्या तयारीत व्यग्र आहे. हा चित्रपट हॉलिवूडचा सुपरहिट ठरलेला रॉकीचा हिंदी रिमेक आहे. रॉकीमध्ये हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलोन मुख्य भूमिकेत होता. सध्या फरहान सोशल मीडियावर तुफानच्या तयारीचा व्हिडिओ शेअर करत असतो. या व्हिडिओत तो बॉक्सिंगचा अभ्यास करताना दिसतो. गेल्या काही दिवसांपूर्वी तो रिलेशनशीपमुळे चर्चेत होता. सध्या मॉडेल शिबानी दांडेकरला डेट करतो आहे.
फरहान अख्तर व शिबानी दांडेकर हे दोघे सध्या रिलेशनशीपमध्ये आहेत आणि हे दोघे बऱ्याचदा एकत्र फिरताना दिसतात. याशिवाय ते दोघे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील करत असतात.
फरहान अख्तरच्या पहिल्या पत्नीचे नाव अधुना होते. २०००मध्ये फरहान व अधुना विवाहबंधनात अडकले होते. पहिल्या पत्नीपासून फरहानला दोन मुली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार लग्न झालेला असतानाही फरहानचे कोणासोबत तरी अफेयर होते. याच कारणामुळे त्याचे लग्न तुटले.
पहिली पत्नी अधुना हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर फरहान शिबानीच्या प्रेमात पडला. फरहान व अधुनाचा संसार १५ वर्षे चालला. पण अचानक दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर लगेच फरहान व शिबानीच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली होती. हे कपल लवकरच लग्न करणार असे मानले जात आहे.
फरहान अख्तरने भाग मिल्खा भाग, दिल चाहता है, जिंदगी ना मिलेगी दोबारा, स्काय इज पिंक यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. आता त्याचा आगामी चित्रपट तुफान २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.