BIRTHDAY SPECIAL : ‘गोल्डन मॅन’ झाला ६४ वर्षाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2016 10:38 PM2016-11-26T22:38:04+5:302016-11-26T23:37:44+5:30
बॉलिवूडला ‘रॉक अॅण्ड डिस्को’ची ओळख करून देणारे अन् संपूर्ण देशाला आपल्या संगीताच्या तालावर नाचविणारे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी ...
बॉलिवूडला ‘रॉक अॅण्ड डिस्को’ची ओळख करून देणारे अन् संपूर्ण देशाला आपल्या संगीताच्या तालावर नाचविणारे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी ६४ वर्षांचे झाले आहेत. अंगावर सर्वत्र सोने परिधान करण्याची आगळीवेगळी आवड जपणाºया बप्पीदाला बॉलिवूडचा ‘गोल्डन मॅन’ असेही संबोधले जाते.
बप्पीदाचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ रोजी कोलकाता येथे झाला. नेहमीच अंगभर सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या बप्पीदाचा लुक जितका हटके वाटतो तितकाच त्यांच्या म्युझिकमध्येही वेगळेपणा वाटतो. मात्र ही सोन्याची आवड केवळ बप्पीदालाच आहे, असे अजिबात नाही, तर त्यांच्या पत्नीकडे त्यांच्यापेक्षाही अधिक सोने आहे.
किशोर कुमार व ग्यानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबत बप्पी लाहिरी
बप्पीदाने ७०च्या दशकात बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. पुढे संपूर्ण ८०च्या दशकात त्यांच्या संगीताची जादू देशभर राहिली. मात्र करिअरमध्ये चढउतार होणे अटळ असल्याने त्याचा बप्पीदालाही सामना करावा लागला. ९०च्या दशकात त्यांच्या म्युझिकला फारसे पसंत केले गेले नाही. मात्र त्यांनी कधीही संगीताला आपल्यापासून दूर ठेवले नाही. ते सातत्याने कामात व्यस्त राहिले.
२०११ मध्ये रिलिज झालेल्या ‘डर्टी पिक्चर’मधील त्यांच्या ‘ऊ ला ला ऊ लाला...’ या गाण्याने धूम उडवून दिली. बप्पीदाचा आवाज असलेल्या या गाण्याने तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्याव्यतिरिक्त २०१४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर खासदारकी लढविली. मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. मात्र गायक आणि संगीतकार म्हणून त्यांचा करिष्मा आजही कायम आहे.
त्यांचे ‘आया मेरा दोस्त, आय एम ए डिस्को डांसर, जूबी-जूबी, याद आ रहा है तेरा प्यार, यार बिना चैन कहां रे, तम्मा तम्मा लोगे’ आदि सुपरहिट गाणी त्यांनी गायिले आहेत. बप्पीदाच्या अशाच काही टॉप टेन बाबींवर टाकलेला हा दृष्टीक्षेप...
पत्नी चित्रानीसोबत बप्पी लाहिरी
घरातून संगीताचा वारसा लाभलेल्या बप्पीदाचे वडील अपरेश लाहिरी हे प्रसिद्ध बंगाली गायक होते. त्यांची आई बांसरी लाहिरी या संगीतकार होत्या. घरातून मिळालेला हा वारसा बप्पीदाने यशस्वीपणे पुढे नेला. बप्पीदाने १९७७ मध्ये चित्रानी यांच्याबरोबर विवाह केला.
बप्पीदाने बालवयातच म्हणजेच वयाच्या तिसºया वर्षी तबला शिकायला सुरुवात केली अन् तेव्हापासूनच त्यांची संगीताप्रतीची आवड वाढत गेली. आई-वडिलांकडून संगीताचे धडे घेताना बप्पीदाने लहानवयातच मोठा संगीतकार होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यांनी पहिले गाणे बंगाली चित्रपटात गायिले होते.
बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी बप्पीदाने वयाच्या १९व्या वर्षी कोलकाता सोडले होते. त्यांना पहिल्यांदा ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगीत देण्याची संधी मिळाली. हा प्रसंग १९७३ मधील आहे.
१९७५ मध्ये बप्पीदाला खºया अर्थाने ओळख मिळाली. कारण यावर्षी त्यांना ‘जख्मी’ या चित्रपटात मोहम्मद रफी आणि किशोरकुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
फेव्हरेट गायिका उषा उत्थप यांच्यासमवेत गीत सादर करताना बप्पीदा
किशोरकुमार बप्पीदाचे नातेवाईक होते. त्यामुळे त्यांच्याकडूनदेखील बप्पीदाला संगीताचे धडे मिळाले. बॉलिवूडमध्ये जम बसविण्यासाठी किशोरकुमार यांनी बप्पीदाला बरीचशी मदत केली.
संगीत आणि गायिकेबरोबरच बप्पीदाने सामाजिक कार्यातदेखील स्वत:ला आघाडीवर ठेवले. ‘जस्टिस फॉर विडोज’ नावाच्या एका स्वयंसेवी संघटनेबरोबर त्यांनी अनेक कौतुकास्पद कार्य केले. यासाठी त्यांना ‘हाउस आॅफ लॉर्डस’ या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले.
बप्पीदाने आतापर्यंत जेवढेही गाणी संगीतबद्ध केलीत त्यामध्ये सर्वाधिक किशोरकुमार आणि विजय बेनेडिक्ट यांनी गायिले आहेत. बप्पीदाला उषा उत्थप आणि अलीषा चिनॉय यांचा आवाज खूपच आवडतो.
फिल्म म्युझिकमध्ये पॉप मिक्चर करण्याचे श्रेयदेखील बप्पीदा यांनाच जाते. त्यांच्या या प्रयोगामुळे बॉलिवूडची दिशाच बदलून गेली आहे.
बप्पीदाने एक दिवसात सर्वाधिक गाणे रिकॉर्ड करण्याचा रेकॉर्डही बनविला आहे. याबद्दल त्यांचे बॉलिवूडमध्ये विशेष कौतुकही केले गेले.
बॉलिवूडमधील बप्पीदा एकमेव असे संगीतकार आहेत, ज्यांना किंग आॅफ पॉप मायकल जॅक्सन याने मुंबईत झालेल्या त्याच्या शोमध्ये आमंत्रित केले होते. हा लाइव्ह शो १९९६ मध्ये आयोजित केला होता.
मायकल जॅक्सनप्रती बप्पीदाचे प्रेम दर्शविणारे छायाचित्रे