Birthday Special : या कारणामुळे झाले होते हरमन बावेजा व प्रियंका चोप्राचे ब्रेकअप!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 01:22 PM2019-11-13T13:22:52+5:302019-11-13T13:24:41+5:30

२००९ मध्ये आलेल्या ‘लव्ह स्टोरी २०५०’ डेब्यू करणारा हरमन बावेजा त्याच्या अ‍ॅक्टिंगपेक्षा हृतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणूनच अधिक लोकप्रीय झाला होता. एकेकाळी प्रियंका चोप्रासोबतच्या अफेअरमुळेही हरमन चर्चेत होता.

birthday special : harman baweja affair and breakup with priyanka chopra | Birthday Special : या कारणामुळे झाले होते हरमन बावेजा व प्रियंका चोप्राचे ब्रेकअप!

Birthday Special : या कारणामुळे झाले होते हरमन बावेजा व प्रियंका चोप्राचे ब्रेकअप!

googlenewsNext
ठळक मुद्देहरमनचे पाठोपाठ अनेक चित्रपट फ्लॉप झाल्याने प्रियंकाने त्याच्यासोबतचे नाते तोडले, अशीही चर्चा त्याकाळात होती.

२००९ मध्ये आलेल्या ‘लव्ह स्टोरी २०५०’ डेब्यू करणारा हरमन बावेजा त्याच्या अ‍ॅक्टिंगपेक्षा हृतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणूनच अधिक लोकप्रीय झाला होता.  लुक्स आणि हॉट बॉडी यामुळे हरमनची त्यावेळी बरीच क्रेझ होती. अर्थात हळूहळू  ही क्रेझ ओसरली आणि हरमन बॉलिवूडमधून बाहेर फेकला गेला.   एकेकाळी सिक्स पॅक अ‍ॅब्सचा बादशाह असलेला हरमन आज पुरता बदलला आहे. ना कसलेले शरीर, ना सिक्स अ‍ॅब्स. काही दिवसांपूर्वी पांढरे केस, वाढलेले वजन अशा रूपात तो दिसला होता. याच हरमनचा आज वाढदिवस. 

हरमन  एकेकाळी प्रियंका चोप्रासोबतच्या अफेअरमुळेही चर्चेत होता. ‘लव्ह स्टोरी २०५०’च्या सेटवरच प्रियंका व हरमनची मैत्री झाली होती. त्यावेळी हरमन इंडस्ट्रीत अगदी नवखा होता. पण प्रियंकासोबत मात्र त्याची मैत्री चांगलीच बहरली. पुढे दोघेही एकमेकांच्या प्रेमातही पडले. अर्थात ‘वॉट्स यॉर राशी’ या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी दोघांचेही ब्रेकअप झाले. एका मुलाखतीत हरमनने या ब्रेकअपमागचे कारण सांगितले होते.

‘माझ्याकडे प्रियंकासाठी वेळ नव्हता. माझे आधीच दोन सिनेमे फ्लॉप झाले होते. अशात मला ‘वॉट्स यॉर राशी’ हा सिनेमा मिळला. माझ्यावरचा दबाव वाढला होता. हा चित्रपट फ्लॉप होता कामा नये, हा माझा प्रयत्न होता. माझा संपूर्ण फोकस या चित्रपटावर होता. शिवाय दिग्दर्शकानेही मला पर्सनल रिलेशन बाजूला ठेवून कामावर लक्ष देण्याची तंबी दिली होती. प्रियंकाला माझा वेळ हवा होता. पण मी वेळ देऊ शकत नव्हतो. यामुळेच आमच्यात मतभेद निर्माण झालेत आणि आम्ही वेगळे झालोत,’ असे त्याने सांगितले होते.

हरमनचे पाठोपाठ अनेक चित्रपट फ्लॉप झाल्याने प्रियंकाने त्याच्यासोबतचे नाते तोडले, अशीही चर्चा त्याकाळात होती. अर्थात हरमनने ही चर्चा नाकारली होती. ‘मी अशा अफवांवर विश्वास ठेवत नाही. प्रेमात असलेल्या दोन व्यक्तिच त्यांच्यात नेमके काय झाले, हे सांगू शकतात.  यश अपयशामुळे प्रेमात काहीही फरक पडत नाही,’असेही त्याने सांगितले होते.

Web Title: birthday special : harman baweja affair and breakup with priyanka chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.