Birthday Special : ईशा कोप्पीकर बॉलिवूडमधून गायब असली तरी आहे कोट्याधीश, बिझनेसमनसोबत केलंय लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 04:02 PM2020-09-19T16:02:57+5:302020-09-19T16:03:42+5:30
बॉलिवूडमध्ये खल्लास गर्ल म्हणून ओळखी जाणारी अभिनेत्री ईशा कोप्पीकर आज ४४वा वाढदिवस साजरा करते आहे.
बॉलिवूडमध्ये खल्लास गर्ल म्हणून ओळखी जाणारी अभिनेत्री ईशा कोप्पीकर आज ४४वा वाढदिवस साजरा करते आहे. ईशाचा जन्म १९ सप्टेंबर, १९७६ साली मुंबई माहिममध्ये झाला. ईशा कोकणी कुटुंबातील असून तिने तिच्या करियरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती. ईशाने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काही हिट चित्रपटांमध्ये काम केले असले तरी ती गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये फार कमी दिसते. चित्रपटात काम करत नसली तरी ईशाकडे बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींइतकीच संपत्ती तिच्याकडे आहे. तिचे लग्न एका व्यवसायिकासोबत झाले असून तिला एक मुलगी देखील आहे.
ईशाने मुंबईतील रुईया कॉलेजमधून शिक्षण घेतले असून तिने मॉडेलिंग क्षेत्रातून करियरची सुरूवात केली. करिअरच्या सुरुवातीला अनेक जाहिरातींमध्ये झळकली होती. मॉडलिंग करत असताना तिला चंद्रलेखा या दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून तिच्या अभिनय प्रवासाला सुरूवात झाली.
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्यानंतर ईशा बॉलिवूडकडे वळली. तिने फिजा या चित्रपटातील एका आयटम साँगद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कंपनी या चित्रपटातील खल्लास या गाण्यामुळे तिला खल्लास गर्ल अशी ओळख मिळाली.
तिने पिंजर, दिल का रिश्ता, क्या कूल है हम, डॉन यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने आत्तापर्यंत हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड अशा विविध भाषेतील चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'एक विवाह ऐसा भी' या चित्रपटात सोनू सुदसोबत ती मुख्य भूमिकेत दिसली होती.
ईशाने २००९ साली टीमी नारंगसोबत लग्न केले. तो एक व्यावसायिक आहे. त्याचा हॉटेल बिझनेस असून त्याची संपत्ती प्रचंड आहे. त्या दोघांनी अतिशय साधेपणाने मुंबईत लग्न केले होते. त्यांना रायना ही मुलगी असून तिचा जन्म जुलै 2014 मध्ये झाला.
ईशाच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिच्या पतीचे आणि मुलीचे अनेक फोटो पाहायला मिळतात. ईशा आता अभिनयासोबतच राजकारणात कार्यरत असून तिने काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.