Birthday Special : आपल्या वडिलांचा तिरस्कार करायचा जावेद जाफरी; हे होते कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 06:29 AM2017-12-04T06:29:30+5:302017-12-04T12:05:20+5:30
बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी याचा आज (४ डिसेंबर) वाढदिवस. मुंबईत ४ डिसेंबर १९६३ रोजी जावेदचा जन्म झाला. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध ...
ब लिवूड अभिनेता जावेद जाफरी याचा आज (४ डिसेंबर) वाढदिवस. मुंबईत ४ डिसेंबर १९६३ रोजी जावेदचा जन्म झाला. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता जगदीप जाफरी याचा जावेद हा मुलगा. पित्याकडून जावेदला अभिनयाचा वारसा मिळाला.
‘मेरी जंग’मधून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटातील ‘बोल बेबी बोल रॉक एन रोल’ हे गाणे प्रचंड लोकप्रीय झाले. यातील जावेदचा डान्स लोकांना चांगलाच भावला होता. ओह डार्लिंग ये है इंडिया, अर्थ, गैंग, मैं प्रेम की दीवानी हूं, जजंतरम ममंतरम, सलाम नमस्ते, ता रा रम पम, धमाल, सिंह इज किंग, 3 इडियट्स, कमबख्त इश्क, लफंगे परिंदे, डबल धमाल, असे अनेक चित्रपट त्याने केलेत.
जावेदला मल्टि टॅलेन्टेड अॅक्टर म्हटले आहे. अभिनेत्यासोबत तो एक उत्तम डान्सर आहे. याशिवाय एक व्हॉईस आर्टिस्ट, कॉमेडियन, शो होस्ट अशा अनेक भूमिकांमध्ये तो दिसला. व्हीजे आणि जाहिरातींचा निर्माता म्हणूनही त्याने काम केले.
जावेद जाफरीचे वडिल जगदीप जाफरी यांचा ‘शोले’ आणि ‘अंदाज अपना अपना’मधील भूमिका कुणीही विसरू शकत नाही. पण जावेदने इंडस्ट्रीत आपल्या पित्याचा नावाचा कधीही वापर केला नाही. युवावस्थेत जावेदचे त्याच्या वडिलांसोबतचे नातेसंबंध प्रचंड विकोपाला गेले होते. जगदीप यांना जुगार आणि दारूचे व्यसन होते. त्यांच्या या व्यसनामुळे जावेद त्यांच्यावर नाराज होता. जगदीप यांनी एकदा दारू सोडली. पण नंतर त्यांनी पुन्हा दारूला जवळ केले. यामुळे जावेद वडिलांचा तिरस्कार करायचा. अर्थात आता दोघांचेही संबंध चांगले आहेत.
'
सन २०१४ मध्ये जावेद जाफरीने राजकारणात पाऊल ठेवले. आम आदमी पार्टीच्या तिकिटावर लखनौमधून जावेदने लोकसभा निवडणूक लढली. राजनाथ सिंग यांच्याविरूद्ध त्यांनी निवडणूक लढली. पण या निवडणुकीत जावेदला पराभव पत्करावा लागला.