Birthday Special : रेमोचा कोरियोग्राफर ते दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 05:42 AM2018-04-02T05:42:10+5:302018-04-02T11:12:10+5:30
दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर रेमो डिसूझा आज 43 वर्षांचा झाला आहे, रेमोचा जन्म 2 एप्रिल 1974 साली बेंगळुरुमधल्या एका मध्यमवर्गीय ...
द ग्दर्शक आणि कोरियोग्राफर रेमो डिसूझा आज 43 वर्षांचा झाला आहे, रेमोचा जन्म 2 एप्रिल 1974 साली बेंगळुरुमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. रेमोचे वडील गोपी नायर हे इंडियन एयरफोर्सचे ऑफिसर होते. रेमोला आज जे यश मिळाले आहे त्यासाठी त्याला प्रचंड स्ट्रगल करावे लागले आहे.
रेमोने 10 वीपर्यंतचे शिक्षण गुजरातमधील जामनगरमधून पूर्ण केले. रेमोच्या वडिलांचे स्वप्न होते की त्यांने एअरफोर्स ज्वाईन करावे मात्र रेमोला डान्समध्ये करिअर करायचे होते. रेमोने डान्ससाठी कोणतीच प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलेली नाही. शाळेत तो अनेक वेळा फंक्शना डान्स करायचा. एक इंटरव्हु दरम्यान रेमोने सांगितले होते कि त्याने चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओ बघून डान्स शिकला आहे. मित्रांच्या मदतीने तो मुंबईत आला. त्यांने मुंबईत डान्स अॅकडेमी सुरु केली. सुरुवातीला त्याच्याकडे फक्त 4 स्टुडेंट्स होते ज्यांची संख्या हळुहळु वाढत गेली. रेमोने एका इंटरव्हु दरम्यान सांगितले होते, पावसाळ्यात त्याच्याकडे डान्स शिकायला कोणीच यायचे नाही. त्यामुळे त्याच्याकडे जेवायला पैसे नसायचे.
रेमोकडे इंडस्ट्रिचे लक्ष त्यावेळी गेले जेव्हा त्याच्या टीमने ऑल इंडिया डान्स कॉम्पिटिशन जिंकले. त्यांने एक वर्ष अहमद खानचा असिस्टेंट म्हणून कामदेखील केले. कोरियोग्राफीसाठी त्याला नॅशनल अवॉर्डदेखील मिळाले आहे. रेमो सध्या सलमान खानचा आगामी चित्रपट 'रेस3'चे दिग्दर्शन करतो आहे. या चित्रपटाची शूटिंगसध्या आबुधाबीमध्ये सुरु आहे. सलमानबरोबर यात जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर आणि बॉबी देओलची मुख्य भूमिका आहे.‘रेस3’मध्ये सलमान पहिल्यांदा निगेटीव्ह कॅरेक्टरमध्ये दिसेल. या चित्रपटाची निर्मिती रमेश तौराणी करता येत. ‘रेस’ आणि ‘रेस2’ हे दोन्ही पार्ट आपण बघितले आहेत. ‘रेस3’ हा या फ्रेंचाइजीपेक्षा वेगळा असल्याचा दावा केला जात आहे. यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.