Birthday Special : करिश्मा व करिनाने दत्तक घ्यावे, अशी आहे रणधीर कपूर यांची इच्छा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 05:43 AM2018-02-15T05:43:37+5:302018-02-15T11:13:37+5:30
रणधीर कपूर यांचा आज (15 फेब्रुवारी) वाढदिवस. वडिल राज कपूर यांच्या पावलावर पाऊल टाकत रणधीर बॉलिवूडमध्ये आलेत आणि पुढे ...
र धीर कपूर यांचा आज (15 फेब्रुवारी) वाढदिवस. वडिल राज कपूर यांच्या पावलावर पाऊल टाकत रणधीर बॉलिवूडमध्ये आलेत आणि पुढे अभिनेता, दिग्दर्शक अशी कारकिर्द त्यांनी गाजवली. १९७२ मध्ये ‘जवानी दीवानी’ आणि ‘रामपूर का लक्ष्मण’ शिवाय १९७४ मध्ये आलेला ‘हाथ की सफाई’ हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजलेत. १९९१ मध्ये आलेला ‘हिना’ हा रणधीर कपूर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट. खरे तर या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कपूर करणार होते. मात्र राज कपूर यांच्या अचानक मृत्यूमुळे ही जबाबदारी रणधीर कपूर यांच्यावर आली. त्यांनीही ती तितक्याच समर्थपणे पेलली. हा चित्रपट सुपरहिट ठरला.
‘कल और आजकल’ या चित्रपटाच्या सेटवर रणधीर त्यांची को- स्टार बबीता हिच्या प्रेमात पडले आणि लगेच बबीतासोबत लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण कपूर घराण्याचा या लग्नाला विरोध होता. कारण कपूर घराण्यातील वारसाने अभिनेत्रीशी लग्न करणे म्हणजे, त्यावेळी गुन्हा होता. पण रणधीर कपूर यांनी कुणालाही न जुमानता बबीता यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे लग्नही केले.रणधीरसोबत लग्न झाले तेव्हा बबीता २४ वर्षांच्या होत्या. या दांम्पत्याला करिश्मा व करिना अशा दोन मुली झाल्या. आज करिश्मा व करिना दोघीही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत.
८० च्या दशकात रणधीर यांच्या करिअरला ओहोटी लागली आणि याचकाळात बबीता यांनी त्यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घतला. बबीता यांना करिश्माला अभिनेत्री बनवायचे होते. पण सुरूवातीला रणधीर यांचा याला तीव्र विरोध होता. आपल्या मुलींनी अॅक्टिंग क्षेत्रात येऊ नये, असे त्यांचे मत होते. यानंतर बबीता यांनी आपल्या दोन्ही मुलींसोबत रणधीर यांचे घर सोडले. अर्थात दोघांनीही आजतागायत घटस्फोट घेतला नाही. ते केवळ विभक्त झालेत. विभक्त झाल्यानंतरही दोघांनीही दुसरे लग्न केले नाही. आजही रणधीर व बबीता विभक्त आहेत. पण अनेक प्रसंगात ते एकत्र दिसतात. करिश्मा व करिनाचीही पित्यासोबत अतिशय चांगली बॉन्डिंग आहे.
ALSO READ : 'या' बॉलिवूड कपल्सनी वेगळे झाल्यानंतर ही घेतला नाही घटस्फोट
मुलींनी अॅक्टिंग क्षेत्रात येऊ नये, असे रणधीर कपूर यांचे एकेकाळी मत होते. पण आज त्यांना आपल्या दोन्ही मुलींचा अभिमान वाटतो. एका मुलाखतीत रणधीर यावर बोलले होते. माझ्या दोन्ही मुली त्यांच्या आयुष्यात यशस्वी आहेत, आनंदी आहेत. माझ्यापेक्षा श्रीमंत आहेत, याचा मला अभिमान आहे. तुम्ही इतक्या श्रीमंत आहात, मग मला दत्तक घेऊन घ्या, असे अनेकदा मी माझ्या मुलींना म्हणतो, असे रणधीर यांनी सांगितले होते.
७० व्या वर्षीही रणधीर कपूर इंडस्ट्रीतील अनेक इव्हेंट व फॅमिली फंक्शनमध्ये दिसतात. यावयातही ते अगदी फिट आहेत.