लिव्ह-इनमध्ये राहिले अन् लग्नाच्या १५ वर्षांनी मोडला संसार! एक फोन कॉलमुळे सुरु झालेली किरण-आमिर लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 10:47 AM2023-11-07T10:47:08+5:302023-11-07T10:53:12+5:30

आमिर खानने सांगितले होते की, मी जेव्हा 'लगान' सिनेमा करत होतो तेव्हा किरणसोबत भेट झाली होती

Birthday special kiran rao aamir khan love story started from the set of lagaan | लिव्ह-इनमध्ये राहिले अन् लग्नाच्या १५ वर्षांनी मोडला संसार! एक फोन कॉलमुळे सुरु झालेली किरण-आमिर लव्हस्टोरी

लिव्ह-इनमध्ये राहिले अन् लग्नाच्या १५ वर्षांनी मोडला संसार! एक फोन कॉलमुळे सुरु झालेली किरण-आमिर लव्हस्टोरी

आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव आज(७ नोव्हेंबर)ला वाढदिवस साजरा करत आहे. किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती  आणि दोघांनी घटस्फोटाची घोषणा करताच इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. किरणआधी आमिर खानचं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. त्यांचा घटस्फोट झाला आणि किरणच्या रूपाने त्याला पुन्हा प्रेम मिळालं. किरणच्या वाढदिवसानिमित्त  चला जाणून घेऊ किरण आणि आमीर खानची लव्हस्टोरी...

कशी झाली दोघांची भेट?
एका मुलाखतीत आमिर खानने सांगितले होते की, मी जेव्हा 'लगान' सिनेमा करत होतो तेव्हा किरणसोबत भेट झाली होती. ती असिस्टंट डायरेक्टरपैकी एक होती. पण त्यावेळी आमच्यात काहीच नातं नव्हतं. आमची मैत्रीपण झाली नव्हती. ती यूनिटचा भाग होती. 

माझ्या घटस्फोटानंतर काही काळाने मी तिला पुन्हा भेटलो. ट्रॉमाच्या त्या फेजमध्ये तिचा फोन आला होता आणि मी तिच्यासोबत अर्धा तास बोललो. जेव्हा मी फोन ठेवला तेव्हा मी म्हणालो 'My God! जेव्हा मी तिच्यासोबत बोलतो तेव्हा मला फार आनंद होतो'. त्यानंतर आम्ही डेटींग सुरू केलं. आमिर आणि किरण काही काळ लिव्ह-इनमध्येही होते.

दरम्यान २००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद. अचानक लग्नाच्या 15 वर्षानंतर किरण आणि आमिरने वेगळ होण्याचा निर्णय घेतला. आमिरचा हा निर्णय चाहत्यांसाठीही धक्कादायक होता. आजही दोघे अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात.

Web Title: Birthday special kiran rao aamir khan love story started from the set of lagaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.