Birthday Special : जाणून घ्या शत्रुघ्न सिन्हाच्या जीवनातील 'या' १० गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2016 10:20 AM2016-12-09T10:20:08+5:302016-12-09T11:07:25+5:30

‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा यांचा आज (९ डिसेंबर) वाढदिवस आहे. अभिनेता ते नेता असा त्यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. त्यांच्या करिअरमध्ये ...

Birthday Special: Know 10 things in life of Shatrughan Sinha | Birthday Special : जाणून घ्या शत्रुघ्न सिन्हाच्या जीवनातील 'या' १० गोष्टी

Birthday Special : जाणून घ्या शत्रुघ्न सिन्हाच्या जीवनातील 'या' १० गोष्टी

googlenewsNext
ॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा यांचा आज (९ डिसेंबर) वाढदिवस आहे. अभिनेता ते नेता असा त्यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. त्यांच्या करिअरमध्ये अनेक चढउतार आले. या सर्वांवर  ‘खामोश’ म्हणत शत्रुघ्न सिन्हांनी मात केली. आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे वडील म्हणूनही आता त्यांची ओळख निर्माण झाली आहे. यानिमित्त जाणून घ्या  त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या १० गोष्टी.

जन्मगाव : पाटणा

९ डिसेंबर १९४५ रोजी बिहारमधील पाटणा शहरात त्यांचा जन्म झाला. 

तीन भाऊ
त्यांना तीन भाऊ. शत्रुघ्न हे सर्वांत लहान. राम, लक्ष्मण आणि भरत ही त्यांच्या भावांची नावे. शत्रुघ्न यांना दोन मुले लव आणि कुश तसेच मुलगी सोनाक्षी. त्यांच्या घराचे नावही ‘रामायण’ असे आहे. 

डेब्यू :प्रेम पुजारी

देव आनंदच्या ‘प्रेम पुजारी’ या चित्रपटापासून शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रथम अभिनय केला.

                                   
                                   शॉटगन फॅमिली : पत्नी पूनम सिंग व तीन मुले सोनाक्षी, लव आणि कुश समवेत शत्रुघ्न सिन्हा 

लॉस्ट चान्स 

शोले चित्रपटात जयची भूमिका करण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्याअगोदर शत्रुघ्न सिन्हा यांना विचारणा करण्यात आली होती.

शिक्षण : एफटीआयआय

शत्रुघ्न सिन्हा यांनी पुण्याच्या एफटीआयआयमध्ये प्रशिक्षण घेतले. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना त्यांना नावाने स्कॉलरशीप दिली जाते.

बडे दिल वाला

‘कालिचरण’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केवळ २४ तासात कर्मचाऱ्यांना महिन्याचा बोनस देणार असल्याची घोेषणा त्यांनी केली होती. 

                                   
                                    मिस इंडिया वाईफ : शत्रुघ्न सिन्हा आणि पत्नी पूनम सिंग

प्रेम अफवा

शत्रुघ्न सिन्हा आणि रिना रॉय यांची जोडी खूप गाजली. त्यावेळी हे दोघे जण लग्न करणार असल्याच्याही अफवा होत्या.

डिअर वाईफ

शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिंग या माजी मिस इंडिया (१९६८) आहेत. त्यांनी ‘शॉटगन मुव्हीज’ या नावाने फिल्म प्रॉडक्शनला सुरुवात केली.

सर्वात मोठी चूक

१९९१ साली राजेश खन्ना यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. ‘ राजेश खन्ना विरोधात निवडणूक लढवणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. त्यासाठी मी त्यांची माफीदेखील मागितली, असे त्यांनी आपल्या ‘एनिथिंग बट खामोश’ या आत्मचरित्रात लिहिले आहे.


शॉटगन : शत्रुघ्न सिन्हा

राजकीय कारकीर्द

२००९ साली ते पाटणासाहिब मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण त्याशिवाय जहाजबांधणी मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले.

Web Title: Birthday Special: Know 10 things in life of Shatrughan Sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.