Birthday Special : अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जाणून घ्या काही माहित नसलेल्या गोष्टी...!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 04:56 AM2017-10-11T04:56:39+5:302017-10-11T10:26:39+5:30
महानायक अमिताभ बच्चन यांचा आज (११ आॅक्टोबर) वाढदिवस. त्यांच्या वाढदिवशी त्यांच्याबद्दल जाणून घेऊ या काही माहित नसलेल्या गोष्टी. अमिताभ ...
म ानायक अमिताभ बच्चन यांचा आज (११ आॅक्टोबर) वाढदिवस. त्यांच्या वाढदिवशी त्यांच्याबद्दल जाणून घेऊ या काही माहित नसलेल्या गोष्टी.
अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबाद, उत्तरप्रदेश येथे झाला. त्यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होते तर त्यांची आई तेजी बच्चन या मुळच्या फैसलाबाद (पाकिस्तान) येथील हिंदू शीख कुटुंबातील होत्या. अमिताभ यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन (बालसुलभ) या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले. अमिताभ यांच्या वडिलांचे २००३ मध्ये तर आईचे २००७ मध्ये निधन झाले.
हरिवंश राय बच्चन यांच्या दोन मुलांपैकी अमिताभ मोठे. त्यांच्या भावाचे नाव अजिताभ आहे. त्यांच्या आईला रंगभूमीची आवड होती आणि त्यांना एका फिल्ममध्ये भूमिकाही देऊ करण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याऐवजी घर सांभाळण्याला प्राधान्य दिले. अमिताभ बच्चन अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूलमध्ये शिकले. त्यांनी नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये कलाशाखेत शिक्षण घेतले त्यानंतर त्यानी दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानशाखेतली पदवी संपादन केली. ऐन विशीत कोलकत्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजंटची नोकरी सोडून देऊन अभिनयात कारकीर्द करण्याचा निर्णय अमिताभ यांनी घेतला. अमिताभ याच्या वडिलांनी त्यांचे नाव इन्कलाब ठेवले होते. मात्र कवि सुमित्रानंदन पंत यांच्या सल्लयावरून हरिवंश राय बच्चन यांनी हे नाव बदलून अमिताभ ठेवले. आज अमिताभ शतकातला श्रेष्ठ कलावंत, शतकातला महानायक असले तरी हा प्रवास सोपा नव्हता. १९६९ मध्ये मृणाल सेन यांच्या बंगाली चित्रपटास आवाज देऊन त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.
मुंबईत पाऊल ठेवले तेव्हा अमिताभ यांच्याकडे राहायला घर नव्हते. मरीन ड्राईव्हवर त्यांनी आपल्या अनेक रात्री घालवल्या. याचदरम्यान कॉमेडियन महमूद अली यांनी अमिताभ यांना आपल्या घरात आश्रय दिला. संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी त्यांना मदत केली. केवळ पैशांसाठी त्यांनी आॅल इंडिया रेडिओमध्ये न्यूज रिडरच्या पदासाठी इंटरव्ह्यू दिला होता. मात्र भरभक्कम आवाज आणि सावळ्या रंगामुळे त्यांना ही नोकरी नाकारण्यात आली. ‘सात हिंदुस्तानी’मधून अमिताभ यांना ब्रेक मिळाला. या पुरस्कारासाठी त्यांना बेस्ट डेब्यूचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. पण या चित्रपटासाठी त्यांना केवळ १ हजार रुपए मानधन मिळाले होते.
ALSO READ : या एका घटनेमुळे तुटलं अमिताभ आणि रेखा यांचं प्रेमाचं नातं!कोणती आहे ती घटना,जाणून घ्या ?
अमिताभ आणि अभिनेत्री रेखा यांची ‘अनटोल्ड लव्ह स्टोरी’ कमालीची गाजली. ‘दो अंजाने’या चित्रपटाच्या सेटवर रेखा आणि अमिताभच्या प्रेमाचा अंकुर बहरला. या चित्रपटानंतर रेखाची इमेज पूर्णपणे बदलली, तिच्या करिअरमधील हा चित्रपट टर्निंग पॉर्इंग असल्याचे बोलले जाते.
रेखा आणि अमिताभ नेहमी सिक्रेटली रेखाच्या एका मैत्रिणीच्या बंगल्यात भेटायचे. परंतु एके दिवशी अमिताभ यांचा संयम सुटला आणि त्यांनी ‘गंगा की सौगंध’ या चित्रपटाच्या सेटवर रेखाच्या सहकलाकाराशी तिच्या वरुन भांडण केले. यानंतर अमिताभ व रेखा यांच्या अफेअर्सची चर्चा सर्वत्र झाली. ऋषी कपूर आणि नितू सिंगच्या लग्नामध्ये रेखा भांगात कुंकू भरून आणि गळ्यात मंगळसूत्र घालून गेली होती. त्यावेळी सर्वांचेच लक्ष तिने वेधून घेतले. अमिताभ-रेखाने गपचूप लग्न केल्याची चर्चा यावेळी रंगली होती. ‘सिलसिला’ हा या दोघांचाही एकत्र असा शेवटचा चित्रपट होता. यश चोप्रा यांनी त्यावेळी असेही म्हटले होते की, मला भीती वाटतेय की यांची रिअल लाईफ हळूहळू रिलमध्ये उतरत आहे. कारण त्यामध्ये जया अमिताभची पत्नी होती तर रेखा गर्लफ्रेन्ड.
दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या म्हणण्यावरून अमिताभ यांनी जया भादुडी यांच्याशी विवाह केला. अगदी मोजक्या उपस्थितांच्या हजेरीत हा विवाह झाला होता. जया व अमिताभ यांची पहिली भेट पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये झाली होती. याठिकाणी अमिताभ ‘सात हिंदुस्तानी’च्या शूटींगसाठी आले होते. जया व अमिताभ एकमेव असे रिअललाईफ कपल आहे, ज्यांनी ३० पेक्षा अधिक चित्रपटांत एकत्र काम केलेयं.