Birthday Special:रेणुका शहाणेसह माधुरी दीक्षितने धरला ताल, जुना व्हिडीओ शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
By सुवर्णा जैन | Updated: October 7, 2020 14:58 IST2020-10-07T14:49:54+5:302020-10-07T14:58:43+5:30
‘हम आपके है कौन’ या सिनेमातील निशा आणि पूजा आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. आपल्या स्मित हास्याने रसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजवणा-या दोन मराठमोळ्या अभिनेत्री रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षित एकत्र येत धमाल केली होती.

Birthday Special:रेणुका शहाणेसह माधुरी दीक्षितने धरला ताल, जुना व्हिडीओ शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
‘हम आपके है कौन’ या सिनेमातील निशा आणि पूजा आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. आपल्या स्मित हास्याने रसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजवणा-या दोन मराठमोळ्या अभिनेत्री रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षित एकत्र येत धमाल केली होती. निमित्त होते माधुरी दीक्षितचा मराठी सिनेमा बकेट लिस्टच्या प्रमोशनचे. त्यावेळी दोघांनी अशा प्रकारे डान्स करत सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते.
नुकताच माधुरीने या दोघींचा जुना व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना ऊजाळा दिला आहे.आज रेणुका शहाणेचा वाढदिवस आहे. रेणुका यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा माधुरीने दोघींचा खास व्हिडीओ शेअर करत दिल्या आहेत. शेअर केलेल्या व्हिडीओत दोघेही लो चली मै गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळतायेत. माधुरी आणि रेणुका त्यांच्या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना पाहून रसिकांनाही ते जुने दिवस आठवले असणार हे मात्र नक्की. या डान्सने उपस्थितांची मनं तर जिंकलीच, शिवाय साऱ्यांना २५ वर्षे मागे घेऊन जात जुन्या आठवणी ताज्या केल्या.
१९९४ सालचा सर्वांत लोकप्रिय चित्रपट म्हणून 'हम आपके है कौन'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा चित्रपट १९९४ साली सर्वाधिक कमाई करणारा ठरला होता. जवळपास ७४ कोटींची कमाई चित्रपटाने केली होती. तिकीट खिडकीवर शंभर दिवस हा चित्रपट चालला होता. कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित असलेल्या 'हम आपकै हैं कौन' या सिनेमाची कथा प्रत्येकालाच भावली होती.
कलाकारांचा दमदार अभिनय, काळजाला भिडणारी कथा, सिनेमाचं संगीत सारंच रसिकांच्या मनात घर करुन गेले. सलमान खान, माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे, अनुपम खेर, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, यांनी चित्रपटात साकारलेल्या आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. या चित्रपटात प्रेम आणि निशा ही जोडी लोकांना खूप आवडली होती. त्यासोबतच दोघांची लव्हस्टोरी, चित्रपटातील गाणी आणि त्यावरील सलमान आणि माधुरीचा डान्स लोकांना विशेष आवडला होता.