Birthday Special : बर्थ डे गर्ल नीतू चंद्राच्या लेस्बियन फोटोशूटने उडाली होती खळबळ; पाहा, फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 11:17 IST2019-06-20T11:16:04+5:302019-06-20T11:17:48+5:30
बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत नीतू चंद्रा हिचेही एक नाव आहे. २००५ मध्ये अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम स्टारर ‘गरम मसाला’ या चित्रपटाद्वारे नीतूने डेब्यू केला होता. याच नीतूचा आज (२० जून) वाढदिवस.

Birthday Special : बर्थ डे गर्ल नीतू चंद्राच्या लेस्बियन फोटोशूटने उडाली होती खळबळ; पाहा, फोटो!!
बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत नीतू चंद्रा हिचेही एक नाव आहे. २००५ मध्ये अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम स्टारर ‘गरम मसाला’ या चित्रपटाद्वारे नीतूने डेब्यू केला होता. याच नीतूचा आज (२० जून) वाढदिवस.
बिहारच्या पाटणा येथे जन्मलेली नीतू एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पाटण्यात तिचे शालेय शिक्षण झाले. यानंतर दिल्ली विद्यापीठातून तिने पदवीचे शिक्षण घेतले. १९९७ मध्ये वर्ल्ड तायक्वांडो चॅम्पियनशिपमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तायक्वांडोमध्ये तिला ब्लॅक बेल्डने सन्मानित करण्यात आले आहे.
नीतूने ग्लॅमरच्या जगात पाऊल ठेवले, ते मॉडेलिंगद्वारे. कॉलेजच्या दिवसांतच तिने मॉडेलिंग सुरु केले होते. याचदरम्यान ती एका मोठ्या वादात सापडली होती. होय, एक लेस्बियन फोटोशूट करून तिने वाद ओढवून घेतला होता. मॉडेल कृषिका गुप्तासोबतचे तिचे लेस्बियन फोटोशूटवरून मोठे वादळ उठले होते. अनेक लोकांनी याला विरोध दर्शवला होता.
याशिवाय २०१० मध्ये क्रिकेट मॅच फिक्सिंगमध्येही नीतूचे नाव समोर आले होते. इंटरपोल व स्कॉटलँड यार्डने तसा दावा केला होता. नीतूने वादग्रस्त क्रिकेटपटू मोहम्मद आसिफसोबत मॅसेजची देवाण-घेवाण करत क्रिकेट आणि फिक्सिंगबाबत चर्चा केली होती, असा दावा त्यावेळी करण्यात आला होता.
पर्सनल लाईफमुळेही नीतू चर्चेत राहिली. अभिनेता रणदीप हुड्डासोबत नीतूचे अफेअर होते, असे मानले जाते. दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले होते. अर्थात हे रिलेशनशिप फार काळ चालले नाही आणि दोघांचेही ब्रेकअप झाले.
नीतू चंद्रा बॉलिवूडमध्ये फार मोठी झेप घेऊ शकली नाही. नीतू चंद्राने गरम मसाला, ट्रॅफिक सिग्नल, ओए लकी लकी ओए, वन टू थ्री, नो प्रॉब्लम अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे. याशिवाय साऊथच्या अनेक चित्रपटांतही ती झळकली आहे. नीतू चंद्राचा जन्म बिहारच्या पाटण्यात झाला. तिची मातृभाषा भोजपुरी आहे. याचमुळे तिने भोजपुरी सिनेमांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. मिथिला मखान या नीतूच्या भोजपुरी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
पाहुया नीतूचे काही खास फोटो...