Birthday Special : एकेकाळी सलमानच्या घरासोबत जोडले गेले होते अर्जुन कपूरचे नाव!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 10:00 AM2018-06-26T10:00:09+5:302018-06-26T10:00:09+5:30
अभिनेता अर्जुन कपूरचा आज (२६ जून) वाढदिवस. अर्जुन प्रसिद्ध निमार्ते बोनी कपूर यांचा मुलगा आहे. पण आज अर्जुनने स्वबळावर ...
अ िनेता अर्जुन कपूरचा आज (२६ जून) वाढदिवस. अर्जुन प्रसिद्ध निमार्ते बोनी कपूर यांचा मुलगा आहे. पण आज अर्जुनने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक आगळे-वेगळे स्थान निर्माण केले आहे. श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर अर्जुनने केवळ डॅड बोनी कपूर यांनाच नाही; आपल्या दोन्ही सावत्र बहिणी जान्हवी व खुशी यांनाही सावरले. सावरलेच नाही त्यांच्या पाठीशी खंबीर आधार बनून उभा राहिला. कारण अर्जुन कमालीचा हळवा आहे, अर्जुननेही आपली आई गमावलीय. त्यामुळे आई जाण्याचे कदाचित दु:ख तो समजू शकला.
अर्जुन आपल्या आईच्या अतिशय जवळचा होता. आईच्या निधनानंतर तिच्या आठवणीत त्याने आपल्या हातावर ‘माँ’चा टॅटू गोंदवला आहे. अर्जुनची एक बहीण आहे, अंशुला. अंशुला अर्जुनचा जीव की प्राण आहे. आता जान्हवी व खूशी या दोघीही अर्जुनच्य जीव की प्राण झाल्या आहेत. अर्जुन ११ वर्षांचा असताना अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी दुसरे लग्न केले होते. अर्जुनवर याचा मोठा परिणाम झाला. इतका की, आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर मी कधीच लग्न करणार नाही, हे अर्जुनने ठरवून टाकले होते.
कधीच लग्न करणार नाही, असे ठरवणारा अर्जुन प्रत्यक्षात वयाच्या१८ व्या वर्षी अर्जुन पे्रमात पडला होता. होय, सलमानची बहीण अर्पिता खान हिच्यासोबत तो रिलेशनशिपमध्ये होता. हे नाते बरेच गंभीर होते, असेही सांगितले जाते. पण का कोण जाणे, दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर अर्जुन व अर्पिता यांचे ब्रेकअप झाले. पुढे अर्पिताच्या आयुष्यात आयुष शर्मा आला. अर्पिताने त्याच्यासोबत लग्नही केले. पण अर्जुन अद्यापही सिंगल आहे.
मध्यंतरी अर्पिताचीच वहिणी अर्थात अरबाज खान याची एक्स-वाईफ मलायका अरोरासोबत अर्जुनचे नाव जोडले गेले होते, अर्जुन व मलायकाच्या कथित रिलेशनशिपमुळे अरबाजपासून मलायकाने घटस्फोट घेतला, असे मानले जाते, पण कालांतराने या बातम्या निराधार ठरल्या.
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अर्जुनचे वजन १४० किलो होते. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सलमान खानने त्याला मार्गदर्शन केले आणि जीममध्ये कसरतही करून घेतली. वजन कमी करण्यासाठी अर्जुनने ब्लॅक कॉफी पिणे सुरु केले. यामुळे फॅट बर्निंग प्रोसेसचा वेग वाढला. फ्राईड फूड व गोड वर्ज्य केले. व्हाईट ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड, गव्हाच्या पोळीऐवजी बाजरीची भाकरी, साधे दही असे रेग्यूलर डाएट घेतले.
अर्जुनने फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वप्रथम ‘कल हो ना हो’ आणि त्यानंतर ‘सलाम-ए-इश्क’ या फिल्म मध्ये दिग्दर्शक निखिल आडवाणींना सहाय्य केले होते. ‘वाँटेड’ आणि ‘नो एन्ट्री’मध्ये त्याने सहनिर्मात्याची भूमिकाही बजावली. आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्ससोबत अर्जुनच्या तीन फिल्म्सचा करार झाला होता. अर्जुनने अभिनेता म्हणून ‘इशकजादे’मधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली . यात त्याच्यासोबत परिणीती चोप्राने काम केले. ‘औरंगजेब’मध्ये सर्वप्रथम अर्जुनने दूहेरी भूमिका केली होती. यानंतर ‘गुंडे’मध्ये रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रासोबत काम केले. अर्जुनने चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित ’२ स्टेट्स’मध्ये काम केले आहे. शिवाय सोनाक्षी सिन्हासोबत होम प्रोडक्शनच्या ‘तेवर’मध्येही काम केले आहे.