Birthday Special: तुषार कपूरसोबत अफेयरमध्ये होती राधिका आपटे, गुपचुप केलं या सिंगरसोबत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 02:00 PM2019-09-07T14:00:31+5:302019-09-07T14:00:56+5:30

राधिकाचा आज ३४ वा वाढदिवस असून लवकरच ती द वेडिंग गेस्ट चित्रपटात झळकणार आहे.

Birthday Special: Radhika Apte was in an affair with Tushar Kapoor, secretly married or married to Singer | Birthday Special: तुषार कपूरसोबत अफेयरमध्ये होती राधिका आपटे, गुपचुप केलं या सिंगरसोबत लग्न

Birthday Special: तुषार कपूरसोबत अफेयरमध्ये होती राधिका आपटे, गुपचुप केलं या सिंगरसोबत लग्न

googlenewsNext

अभिनेत्री राधिका आपटे हिने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. राधिकाचा आज ३४ वा वाढदिवस असून लवकरच ती द वेडिंग गेस्ट चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता देव पटेल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या राधिका या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. 


राधिकाचा जन्म ७ सप्टेंबर, १९८५ साली तमिळनाडूमधील वेल्लोर येथे झाला होता. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. राधिकाचे वडील डॉ. चारूदत्त आपटे पुण्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत. सुरुवातीचे शिक्षण तिने पुण्यात घेतले नंतर फर्ग्युसन महाविद्यालयातुन तिने अर्थशास्त्र तसेच गणित विषयात पदवी घेतली. राधिकाने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी व तमीळ चित्रपटात काम केलं आहे. राधिका प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करत असते. त्यामुळे बऱ्याचदा ट्रोलही होते.


चित्रपटांशिवाय राधिका तिच्या लव अफेयर्समुळे चर्चेत राहिली होती. राधिकाचं नाव तुषार कपूरसोबतही जोडलं गेलं होतं. मात्र तिनं २०१२ साली गुपचुप लंडनमधील म्युझिशियन बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केलं आणि ही बाब तिनं २०१३ मध्ये सर्वांना सांगितली.


राधिकाच्या नवऱ्याचं नाव बेनेडिक्ट टेलर असून तो लंडनमध्ये स्थायिक आहे. तो एक संगीतकार आहे. राधिका व टेलरनं २०१२ साली लग्न केलं. राधिकाला शूटिंगमधून जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा ती लंडनला जाते. 


असं सांगितलं जातं ती राधिका व बेनेडिक्ट यांची भेट २०११ साली झाली होती जेव्हा राधिका कंटेम्परेरी डान्स शिकण्यासाठी लंडनला गेली होती. एक वर्षे डेट केल्यानंतर या दोघांनी २०१२ साली लग्न केलं आणि २०१३मध्ये अधिकृतपणे जाहीर केलं होतं.

राधिका म्हणाली, जेव्हा टेलरने मला डेट करायला सुरूवात केली होती. त्यावेळी त्याने आपली नोकरी सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आम्हा दोघांना हे योग्य वाटले नाही. आम्ही दोघे आमच्या करियरकडे गांभीर्याने पाहतो. त्यामुळे काम सोडून आम्ही दोघेही खूश राहू शकत नाही. त्यामुळे आम्ही दोघेही कामांना प्राधान्य देतो व एकमेकांना नेहमी प्रोत्साहन देतो.


द वेडिंग गेस्ट चित्रपटाशिवाय राधिका लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रात अकेली है चित्रपटात झळकणार आहे.

Web Title: Birthday Special: Radhika Apte was in an affair with Tushar Kapoor, secretly married or married to Singer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.