BIRTHDAY Special : प्रेमासाठी घर सोडायला तयार होते रणधीर कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2017 09:29 AM2017-02-15T09:29:47+5:302017-02-15T15:01:53+5:30
बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांचा मुलगा आणि अभिनेता रणधीर कपूर यांचा आज(१५ फेबु्रवारी) वाढदिवस. त्यांच्या वाढदिवशी जाणून घेऊ ...
ब लिवूडचे शो मॅन राज कपूर यांचा मुलगा आणि अभिनेता रणधीर कपूर यांचा आज(१५ फेबु्रवारी) वाढदिवस. त्यांच्या वाढदिवशी जाणून घेऊ यात, त्यांच्याबद्दलच्या काही माहित नसलेल्या गोष्टी...
रणधीर कपूर यांनी ‘श्री ४२०’ आणि ‘दो उस्ताद’ सारख्या चित्रपटांतून बाल कलाकार म्हणून काम केले. १९७२ मध्ये ‘जवानी दीवानी’ आणि ‘रामपूर का लक्ष्मण’ शिवाय १९७४ मध्ये आलेला ‘हाथ की सफाई’ हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजलेत. १९७७ मध्ये आलेला ‘चाचा भतीजा’ हा सिनेमाही सुपरहिट ठरला. १९९१ मध्ये आलेला ‘हिना’ हा रणधीर कपूर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट. खरे तर या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कपूर करणार होते. मात्र राज कपूर यांच्या अचानक मृत्यूमुळे ही जबाबदारी रणधीर कपूर यांच्यावर आली. त्यांनीही ती तितक्याच समर्थपणे पेलली. हा चित्रपट सुपरहिट ठरला.
नव्वदीच्या दशकात रणधीर यांनी आर. के. फिल्म्स या बॅनरखाली ‘प्रेम ग्रंथ’ आणि ‘आ अब लौट चले’ या चित्रपटांची निर्मिती केली. अर्थात या चित्रपटांना अपेक्षित यश मिळाले नाही.
रणधीर कपूर यांची लव्ह स्टोरी आणि त्यांचे लग्न हा बॉलिवूडमधील एक गाजलेला किस्सा आहे. अभिनेत्री साधना हिची भाजी आणि अभिनेत्री बबीता हिला पाहिले आणि रणधीर कपूर तिच्या प्रेमात पडले. इतके की, तिला मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण कपूर घराण्याचा विरोध पत्करला. रणधीर यांना लवकरात लवकर बबीताशी लग्न करायचे होते. पण त्यावेळी कपूर घराण्याला कुठलीही अभिनेत्री सून म्हणून मान्य नव्हती. कपूर घराण्याच्या वारसाने अभिनेत्री लग्न म्हणजे, त्यावेळी गुन्हा मानला जायचा. पण रणधीर कपूर हा गुन्हा करायलाही तयार होते. बबीताच्या प्रेमापोटी स्वत:च्या कुटुंबाशी संबंध तोडायलाही ते तयार होते.
रणधीर यांनी राज कपूर यांच्यासमोर बबीताशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. अर्थात राज कपूर यांनी त्यास नकार दिला. बबीताला ते त्यांच्या चित्रपटात भूमिका द्यायला तयार होते. पण तिला आपल्या घरची सून म्हणून पत्करण्यास त्यांचा विरोध होता. पण यानंतरही बबीता व रणधीर भेटत राहिले. पण अखेर बबीता यांनी रणधीर यांना अल्टीमेटम दिला. लग्न करणार नसशील तर मी सोडून जाणार, असे त्यांना ठणकावून सांगितले. मग काय? रणधीर यांनी पुन्हा एकदा प्रेमासाठी राज कपूर यांची मनधरणी सुरु केली. अखेर त्यांना यश आले. पण त्यासाठी बबीताला तिचे फिल्मी करिअर कायमचे सोडावे लागले. याच अटीवर दोघांचे लग्न झाले.