Birthday Special: आईला साडी भेट म्हणून देण्यासाठी या अभिनेत्याला विकावे लागले होते न्यूजपेपर, आता आहे भाजपचा खासदार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 02:23 PM2019-07-17T14:23:28+5:302019-07-17T14:24:02+5:30
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या वडिलांची होती दुधाची डेअरी
रवि किशन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहे.
रवि किशन यांचा जन्म १७ जुलै, १९६९मध्ये जौनपूरमध्ये झाला आहे. त्यांनी भोजपुरी चित्रपटात काम करून लोकप्रियता मिळवली आणि त्यानंतर मुंबईत रवाना झाले. त्यांनी बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.
रवि किशन यांचे जीवन संघर्ष आणि चढउतारांनी भरलं होते. रवि यांच्या वडिलांची आधी दुधाची डेअरी होती. त्यांना रवि यांनी देखील दुधाच्या बिझनेसमध्ये लक्ष द्यावे, अशी इच्छा होती. मात्र रवि यांना या कामात रुची नव्हती. एक वेळ असा आला की रविंच्या वडिलांचा बिझनेस ठप्प झाला.
त्यानंतर संपूर्ण कुटुंब जौनपुरला गेलं. जौनपूरला गेल्यानंतर कुटुंबांची परिस्थिती आणखीन खराब झाली. सर्वजण मातीच्या घरात रहात होते.
एका मुलाखती दरम्यान रवि यांनी त्यांच्या कठीण प्रसंगांबद्दल सांगितलं की, त्यांच्याकडे साडी विकत घेण्यासाठीदेखील पैसे नव्हते. मात्र रवि किशन यांनी तीन महिने वर्तमानपत्र विकून आईसाठी साडी विकत घेतली. पण, त्यांना आईच्या हातचा मार खावा लागला होता. जेव्हा त्यांनी आईला साडी कशी विकत घेतली हे सांगितलं तेव्हा त्यांनी मिठी मारली.
रवि किशन यांना बालपणापासून बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन खूप आवडत होते. त्यामुळे ते आज भोजपुरी सिनेमासृष्टीतील अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जातात.