BIRTHDAY SPECIAL : ​रिटन बाय 'सलीम'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2016 10:12 AM2016-11-24T10:12:57+5:302016-11-24T10:12:57+5:30

एकेकाळी चित्रपट सृष्टीवर ज्यांचा दबदबा होता, ज्यांचे चित्रपट म्हणजे सुपरहिट फॉर्म्युला होता, त्या सलीम-जावेद जोडीतील सलीम खान यांचा आज ...

BIRTHDAY SPECIAL: RETURN BY 'SAILIM' | BIRTHDAY SPECIAL : ​रिटन बाय 'सलीम'

BIRTHDAY SPECIAL : ​रिटन बाय 'सलीम'

googlenewsNext
ेकाळी चित्रपट सृष्टीवर ज्यांचा दबदबा होता, ज्यांचे चित्रपट म्हणजे सुपरहिट फॉर्म्युला होता, त्या सलीम-जावेद जोडीतील सलीम खान यांचा आज वाढदिवस.

सलीम खान यांची आता जरी सलमान खानचे वडील म्हणून ओळख असली, तरी एकेकाळी सलीम खान म्हणजे ‘नाम ही काफी है’ असेच होते. ‘रिटन बाय- सलीम-जावेद’ असे चित्रपटाच्या पोस्टरवर लिहिलेले असले म्हणजे फिल्म हिट होणार याची खात्रीच असायची.

सलीम खान यांनी जावेद अख्तरसह १९७१ ते १९८७ दरम्यान २६ चित्रपट लिहिले, त्यातील २१ सुपरहिट झाले. ही जोडी तुटल्यानंतरही सलीम खान यांनी दहा चित्रपट केले.

सलीम खान यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९३५ रोजी इंदूर येथे झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या हे ‘अननोअन फॅक्टस्’ -

* के. अमरनाथ यांनी सलीम यांना एका लग्नात पाहिले होते. चित्रपटात काम करण्यासाठी मुंबईला येण्याचा त्यांनी सल्ला दिला.

* ज्युनिअर टेक्निशियन म्हणून ४०० रुपये पगारावर त्यांनी पहिली नोकरी केली. सात वर्षे त्यांनी छोट्यामोठ्या भूमिका केल्या.

                                  
                                 ‘खान’दान : अरबाज, सलीम, सलमान आणि सोहेल खान

* १९६६ साली ‘तिसरी मंझील’ या चित्रपटातून त्यांनी सुरुवात केली. ‘सरहदी लुटेरा’ (१९६६), ‘दिवाना’ (१९६७) अशा १७ चित्रपटात त्यांनी भूमिका केली. 

* ‘सरहदी लुटेरा’ चित्रपटादरम्यान सलीम खान यांची जावेद अख्तरशी ओळख झाली. त्यावेळी जावेद अख्तर क्लॅपर बॉय म्हणून काम करीत असे.

* क्लॅपर बॉयसोबतच अबरार अल्वी यांच्याकडे सहायक लेखक, दिग्दर्शक म्हणून सलीम खान काम करायचे तर जावेद अख्तर हे कैफी आझमी यांच्याकडे सहायक म्हणून काम करीत होते.

* अबरार अल्वी आणि कैफी आझमी हे शेजारी होते. त्यातून सलीम खान आणि जावेद अख्तर यांची मैत्री झाली.


शोले :जावेद अख्तर आणि सलीम खान

* चित्रपटांत चांगल्या संवादाचे महत्त्व ओळखून सालीम खान यांनी ही संवाद लेखनाकडे लक्ष देण्यास सुरूवात केली.

* देवर यांनी एका चित्रपटाच्या संवादासाठी जावेद अख्तर यांना मोठी रक्कम दिली होती. सलीम आणि जावेद यांनी मिळून चित्रपटासाठी संवाद लिहिले तर त्यांना रक्कम आणि त्याचे क्रे डीटही देण्याचे मान्य केले होते.

* ‘अंदाज’ (१९७१) चित्रपटात त्यांच्या नावाला क्रेडीट देण्यात आले नव्हते. चित्रपटाच्या यशस्वीतेनंतर खुश होऊन राजेश खन्नांनी त्यांना केवळ पैसेच दिले नाहीत तर ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटासाठी साईनही केले. तेव्हापासून सलीम-जावेद या नावासह त्यांचा प्रवास सुरू झाला.
* या दोघांनी मिळून दोन कन्नड चित्रपटासह २६ चित्रपट केले.

* १९८१ नंतर ते विभक्त झाले. त्यानंतर नाम, कब्जा, तुफान, जुर्म, अकेला, पत्थर के फुल, मस्त कलंदर, आ गले लग जा, दिल तेरा दिवाना हे चित्रपट सलीम खान यांनी लिहिले.

                                   
                                   ब्लॅक अँड व्हाईट : सलमान आणि सलिम खान यांचा तरुणपणातील फोटो

* १९६४ मध्ये सलीम खान यांनी पाच वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर सुशीला चरक यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांचे नाव सलमा असे ठेवण्यात आले.

* १९८१ साली सलीम खान यांनी चित्रपट डान्सर हेलन यांच्याशी दुसरा विवाह केला.

* हा विवाह सलमा यांना मंजूर नव्हता. चारही मुले - सलमान, अरबाज, सोहेल आणि अलवीरा - आईकडे राहत होती.

* सलीम यांनी एका मुलीला दत्तक घेतले होते. तिचे नाव अर्पिता आहे.

त्यांचे काही प्रसिद्ध चित्रपट :
अंदाज, हाथी मेरे साथी, यादोंकी बारात, जंजीर, हात की सफाई, मजबूर, दिवार, त्रिशुल, काला पत्थर, दोस्ताना, सीता और गीता, शोले, आखरी दाव, डॉन, शान, क्रांती, शक्ती, जमाना.

Web Title: BIRTHDAY SPECIAL: RETURN BY 'SAILIM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.