Birthday Special : आईप्रमाणेच स्वत:ला मराठी मुलगी मानतेय श्रद्धा कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 10:32 AM2018-03-03T10:32:37+5:302018-03-03T17:39:45+5:30

प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांची लाडकी लेक आईप्रमाणेच स्वत:ला मराठी मुलगी मानतेय. तिचे वडील पंजाबी आहेत.

Birthday Special: Shraddha Kapoor as mother of mother, himself as mother! | Birthday Special : आईप्रमाणेच स्वत:ला मराठी मुलगी मानतेय श्रद्धा कपूर!

Birthday Special : आईप्रमाणेच स्वत:ला मराठी मुलगी मानतेय श्रद्धा कपूर!

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आज तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करीत आहे. बॉलिवूडपटांमध्ये जबरदस्त खलनायक साकारणारे अभिनेते शक्ती कपूर यांची ती मुलगी आहे. श्रद्धाचे वडील शक्ती पंजाबी असून, शब्दाची आई मराठी आहे. श्रद्धाने तिच्या करिअरची सुरुवात २०१० मध्ये ‘तीन पत्ती’ नावाच्या चित्रपटातून केली. ज्यामध्ये तिच्या भूमिकेचे नाव अपर्णा खन्ना होते. श्रद्धा स्वत:ला आई शिवांगी कोल्हापुरे यांच्याप्रमाणेच एक मराठी मुलगी समजते. श्रद्धा तिच्या आईच्या खूप क्लोज आहे. 



श्रद्धाचे शिक्षण अमेरिकन स्कूल आॅफ बॉम्बे येथे झाले. शालेय जीवनात श्रद्धा फुटबॉल आणि हॅण्डबॉलची खेळाडू होती. पुढील शिक्षण घेण्यासाठी श्रद्धा बॉस्टन येथे गेली. पुढे फेसबुकवरील तिचे काही फोटो बघून निर्माती अंबिका हिन्दुजाने तिला बॉलिवूडमध्ये येण्यास आॅफर दिली. ‘तीन पत्ती’ या चित्रपटात तिला मुख्य भूमिका देताना बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. 
 

डेब्यू चित्रपटात श्रद्धाच्या को-स्टारमध्ये महानायक अमिताभ बच्चन, बेग किंगसले आणि आर. माधवन यांसारखे बडे अभिनेते होते. त्यानंतर श्रद्धाने ‘लव का द एंड’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात श्रद्धा एका कॉलेज स्टूडंटच्या भूमिकेत बघावयास मिळाली. मात्र तिचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. परंतु २०१३ मध्ये आलेल्या ‘आशिकी-२’ या चित्रपटाने श्रद्धाला इंडस्ट्रीत एक वेगळेच स्थान मिळवून दिले. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. श्रद्धाच्या या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा अधिक कमाई केली. 
 

श्रद्धाला अभिनयाबरोबरच गायिकीचाही प्रचंड शौक आहे. तिने तिच्याच बºयाचशा चित्रपटांमध्ये स्वत:चा आवाज दिला आहे. शिक्षणात अव्वल असलेल्या श्रद्धाच्या आईने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर श्रद्धा अभिनेत्री बनली नसती तर तिला डॉक्टर बनायचे होते. 

Web Title: Birthday Special: Shraddha Kapoor as mother of mother, himself as mother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.