Birthday Special : आॅस्करवारी केलेल्या नर्गिसचा संघर्षपूर्ण बॉलिवूड प्रवास!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2017 10:19 AM2017-06-01T10:19:43+5:302017-06-01T15:51:32+5:30
‘मदर इंडिया’ या चित्रपटाचे नाव आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहे. त्याचबरोबर हा चित्रपट आठवला तरी, प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त ...
‘ दर इंडिया’ या चित्रपटाचे नाव आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहे. त्याचबरोबर हा चित्रपट आठवला तरी, प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आठवण होते. कारण असे म्हटले जाते की, जर तुम्ही ‘मदर इंडिया’ हा चित्रपट बघितला नसेल तर तुम्हाला बॉलिवूड फारसे उमजणार नाही. कारण चित्रपटात नर्गिस यांनी आपल्या दमदार अभिनयाने नव्या पिढीसाठी एक संदेश दिला असून, तो आजही तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. या चित्रपटाला आॅस्कर हा सर्वोत्तम पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. वास्तविक नर्गिस यांनी इतरही अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. आज जरी नर्गिस या बॉलिवूडमध्ये नसल्या तरी, त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहणारे आहे. आज त्यांचा जन्मदिवस असून, त्यांच्या यशस्वी बॉलिवूड प्रवासावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...
बेबी नर्गिसने इंडस्ट्रीमध्ये उमटविला ठसा
नर्गिस यांनी खूपच कमी वयात अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. १९३५ मध्ये आलेल्या ‘तलाश’ आणि ‘हक नाम’ या चित्रपटात काम करून बेबी नर्गिसने इंडस्ट्रीमध्ये स्वत:चा ठसा उमटविला. पहिल्याच चित्रपटात त्यांनी दमदार अभिनय केल्याने त्यांच्याकडे चित्रपटाच्या अनेक आॅफर्स होत्या. १९४० आणि ५० च्या दशकात त्यांना अनेक मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये काम करायला मिळाले. यामध्ये ‘चोरी-चोरी’, ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘अंदाज’ आणि ‘बरसात’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाला प्रचंड पसंती मिळाली होती. शिवाय बॉलिवूडमध्ये एका दमदार अभिनेत्रीचा उगम झाला होता.
प्रारंभी जीवन
नर्गिस यांचा जन्म १ जून १९२९ रोजी झाला होता. त्यांच्या आई जद्दनबाई यांना शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड होती. त्यामुळे नर्गिस यांना चित्रपटांमध्ये काम करण्यास आई जद्दनबाई यांचे प्रचंड पाठबळ मिळाले. नर्गिसचे खरे नाव फातिमा राशिद असे होते. तर त्यांचे वडील डॉक्टर होते. त्यांना त्यांच्या आईनेच शास्त्रीय संगीत आणि नृत्याचे प्रशिक्षण दिले.
नर्गिस यांचे संघर्षपूर्ण जीवन
नर्गिस यांचे जीवन अतिशय संघर्षपूर्ण राहिले आहे. करिअरमध्ये एका विशिष्ट ठिकाणी पोहचल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. ‘मदर इंडिया’ या चित्रपटामुळे त्यांचा अभिनय अधिक सक्षम बनला. शिवाय याच चित्रपटातून त्यांना त्यांचा आयुष्याचा जोडीदारही मिळाला. नर्गिस आणि सुनील दत्त यांची प्रेम कथा एखाद्या बॉलिवूड स्टोरीपेक्षा कमी नव्हती. जेव्हा शूटिंगदरम्यान सेटवर आग लागली होती, तेव्हा सुनील दत्त यांनी मोठ्या धाडसने त्यांचे प्राण वाचविले होते. त्याचवेळी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडली. नर्गिस यांनी चित्रपटांव्यतिरिक्त सामाजिक कार्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मानसिकदृष्ट्या कमजोर असलेल्या मुलांसाठी त्या काम करीत होत्या. नर्गिस यांचे निधन कर्करोगासारख्या भयानक आजाराने झाले.
नर्गिस आणि राजकपूरची जोडी
बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ जोडींमध्ये नर्गिस आणि राजकपूरच्या जोडीचा समावेश आहे. या जोडीने १९५० ते १९६० च्या दरम्यान अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. दोघांनी जवळपास १६ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यावेळी दोघांमधील प्रेमसंबंधांच्याही जोरदार चर्चा रंगल्या होत्या. असे म्हटले जात होते की, हे दोघे विवाहबंधनात अडकतील; मात्र तसे झाले नाही.