Birthday Special : एकही चित्रपट न करता दरवर्षी कोट्यवधी रूपये कमावतो सुनील शेट्टी, असा आहे शाही थाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 08:00 AM2019-08-11T08:00:00+5:302019-08-11T09:36:40+5:30

बी-टाऊनमध्ये स्वत:ची वेगळी ओळख बनवणारा अभिनेता सुनील शेट्टी याचा आज वाढदिवस.

birthday special sunil shetty is known as bollywood ambani | Birthday Special : एकही चित्रपट न करता दरवर्षी कोट्यवधी रूपये कमावतो सुनील शेट्टी, असा आहे शाही थाट

Birthday Special : एकही चित्रपट न करता दरवर्षी कोट्यवधी रूपये कमावतो सुनील शेट्टी, असा आहे शाही थाट

googlenewsNext
ठळक मुद्देएकेकाळी याच सुनीलचे वडील एका हॉटेलात भांडी घासायचे. अतिशय कष्टांनी त्यांनी सुनीलला लहानाचे मोठे केले.

बी-टाऊनमध्ये स्वत:ची वेगळी ओळख बनवणारा अभिनेता सुनील शेट्टी याचा आज वाढदिवस. 1992 मध्ये ‘बलवान’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा हा हिरो पुढे अ‍ॅक्शन हिरो म्हणून उदयास आला. अजय देवगण व अक्षय कुमार यासारख्या समकालीन अभिनेत्यांना त्याने जोरदार टक्कर दिली आणि अनेक हिट चित्रपट आपल्या नावावर नोंदवले. याच बळावर तो स्वत:चा एक मोठा बिझनेस उभारू शकला.

होय, आज भलेही सुनील शेट्टीकडे फार चित्रपट नाहीत. पण म्हणून त्याच्याकडे पैशांची कमतरता नाही. कारण चित्रपटांशिवाय त्याचा साईड बिझनेसही आहे. अनेक रेस्टॉरंट, नाईट क्लबचा तो मालक आहे. यावरून त्यांच्या संपत्तीचा अंदाज तुम्ही बांधू शकता. दरवर्षी या बिझनेसमधून हा हिरो १०० कोटींची कमाई करतो. त्यामुळे अगदी राजेशाही थाटात जगतो.

एकेकाळी याच सुनीलचे वडील एका हॉटेलात भांडी घासायचे. अतिशय कष्टांनी त्यांनी सुनीलला लहानाचे मोठे केले. सुनीलनेही या कष्टाचे चीज केले. बॉलिवूडमध्ये कुणीही गॉडफादर नसताना   फिल्म इंडस्ट्रीत त्याने भक्कम स्थान निर्माण केले. आजही तो चित्रपटांत सक्रीय आहे. पण वर्षांचा एखादा चित्रपट तो करतो.

एका मुलाखतीत सुनीलने सांगितले होते की, त्याचे वडील हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करत होते. २०१३ मध्ये त्याले एका नव्या डेकोरेशन शोरूमचे उद्घाटन केले. ही तीच जागा होती, ज्याठिकाणी सुनीलचे वडील वीरप्पा शेट्टी काम करायचे. ‘माझ्या वडिलांनी वयाच्या नवव्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली. प्रचंड कष्ट करून त्यांनी १९४३ मध्ये एक बिल्डिंग खरेदी केली होती. ही बिल्डिंग वरळी येथे फोर सीजन हॉटेलच्या शेजारी आजही उभी आहे. माझ्या वडिलांचे कष्ट मी खूप जवळून बघितले आहेत. ते धान्य भरायच्या गोणीवर झोपायचे. त्यांनी आम्हाला अतिशय हलाखीच्या परिस्थितीत सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला,’ असे तो म्हणाला होता. 

आज सुनील शेट्टी कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. खंडाळा येथे त्याचे ६२०० स्केअर फुटाचे लॅव्हिश फार्म हाऊस आहे. यात एक प्रायव्हेड गार्डन, स्विमिंग पूल, लिव्हिंग रूम, पाच बेडरूम, किचन आहे. त्याचबरोबर मुंबईतील पॉश परिसरात त्याचे  एच २०  नावाचे बार आणि रेस्टॉरंट आहेत. याव्यतिरिक्त साउथमध्येही त्याचे रेस्टॉरंट आहेत. तसेच सुनील शेट्टीचे स्वत:चे बुटिक आहे. सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टी त्याचा हा बिझनेस सांभाळते. 

Web Title: birthday special sunil shetty is known as bollywood ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.