Birthday Special : राज कपूर यांच्या प्रत्येक हिरोईनच्या अंगावर दिसायची पांढरी साडी; जाणू घ्या का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 05:15 AM2017-12-14T05:15:21+5:302017-12-14T10:45:21+5:30
तीन राष्ट्रीय पुरस्कार, ११ फिल्मफेअर पुरस्कार, पद्मभूषण, दादासाहेब फाळके अवार्ड...! पण या पुरस्कारांच्या आकड्यांवरून राज कपूर यांचे यश मोजता ...
त न राष्ट्रीय पुरस्कार, ११ फिल्मफेअर पुरस्कार, पद्मभूषण, दादासाहेब फाळके अवार्ड...! पण या पुरस्कारांच्या आकड्यांवरून राज कपूर यांचे यश मोजता येणार नाही. त्यांना समजण्यासाठी वयाच्या २४ व्या वर्षी एक मोठा दिग्दर्शक बनलेल्या तरूणाला जाणून घ्यावे लागेल. हा तरूण दुसरा कुणी नाही तर स्वत: राज कपूर होते. हा तरूण स्वत: फिल्ममेकिंगचे विद्यापीठ होता. या विद्यापीठात प्रवेश घेण्याची गरज नव्हती. कारण या तरूणाच्या सहवासात येणारी प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडून काहीतरी शिकत होती. १४ डिसेंबर याचदिवशी पाकिस्तानच्या पेशावरमध्ये त्यांना जन्म झाला होता. पेशावरमध्ये जन्मलेला हाच तरूण पुढे बॉलिवूडचा शो मॅन बनला.आज राजकपूर यांचा वाढदिवस. यानिमित्ताने राज कपूर यांच्या विषयी माहिती नसलेल्या काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत..
वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजे १९३५ साली त्यांनी ‘इन्कलाब’ या चित्रपटात ते बालकलाकार म्हणून दिसले राज कपूृर यांचे मुळ नाव रणबीर होते, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. आता त्यांचा नातू अभिनेता रणबीर याचेही नाव त्यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे.
वयाच्या २४ व्या वर्षी म्हणजे सर्वात लहान वयाचा दिग्दर्शक म्हणून राज कपूर यांना ओळखले जाते. खरे तर त्यांना म्युझिक डायरेक्टर बनायचे होते. पण मग ते निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते असे सगळेच बनले. १९४८ मध्ये त्यांनी ‘आर. के. स्टुडिओ’ची स्थापना केली. या स्टुडिओचा पहिला हिट सिनेमा होता, ‘बरसात.’ या चित्रपटात राज कपूर यांच्यासोबत नरगिस मुख्य भूमिकेत होती. यातील त्यांचा व नरगिसचा एक सीन लोकांना इतका आवडला होता की, पुढे तोच आर. के. स्टुडिओचा लोगो बनला. आर. के. स्टुडिओतील त्यांची मेकअप रूम कुणालाही वापरण्याची परवानगी नव्हती. केवळ देव आनंद यांना तेवढी मुभा होती.
राज कपूर यांच्या प्रत्येक चित्रपटात हिरोईन पांढ-या रंगाची साडीत दिसायची. ही पांढरी साडी म्हणजे राज यांचा लकी चार्म म्हणा किंवा त्यांची आवड होती म्हणा. पण त्यांची हिरोईन पांढºया साडीत दिसायचीच. एकदा त्यांनी पत्नीला पांढरी साडी भेट म्हणूनदिली होती. ही साडी त्यांना इतकी आवडली की, यानंतर त्यांच्या सर्व हिरोईनच्या अंगावर पांढरी साडी असायची.
ALSO READ : शो मॅन राज कपूरची गाजलेली प्रेमप्रकरणे
राज कपूर यांनी ज्या सिनेमांची निर्मिती केली, ती त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याची प्रतिमा मानली जाते. नर्गिस यांच्याबद्दल त्यांना वाटणारे प्रेम त्यांनी विविध चित्रपटातून व्यक्त केले. राज कपूर यांचे जगभरात चाहते होते. मध्य पूर्व आशिया, रशिया, आफ्रिका, चीन, दक्षिणपूर्व आशिया या देशांमध्ये त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी होती. ‘मेरा जुता है जपानी’ हे गीत जगभरात प्रसिद्ध झाले होते. ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट दीर्घ लांबीचा होता. पाच तासांच्या या चित्रपटामध्ये दोन इंटरव्हल होते.
राज कपूर यांची तब्येत ठीक नसतानाच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी दिल्लीला येण्याचे निमंत्रण मिळाले. ते तयारही झालेत. दिल्लीच्या सीरिफोर्ट आॅडिटोरियममध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार होता. सुरक्षा कारणास्तव राज कपूर यांना आॅक्सिजन सिलींडर सोबत नेण्याची परवानगी नाकारली गेली होती. पुरस्कारासाठी त्यांचे नाव पुकारले गेले,तेव्हाच त्यांच्या छातीत तीव्र कळ आली. हे पाहून तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमन प्रोटोकॉल तोडून स्टेजवरून खाली उतरत राज कपूर यांच्या जवळ आले होते. राज कपूर यांना ताबडतोब एम्स रूग्णालयात हलवण्यात आले. एक महिना रूग्णालयात राहिल्यानंतर त्यांनी येथेच अंतिम श्वास घेतला.