Birthday Special: कंगणा राणौतने या अभिनेत्याचा केला होता मानसिक आणि शारीरिक छळ, अभिनेत्यांनेच सांगितली आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 18:53 IST2020-03-23T18:49:53+5:302020-03-23T18:53:58+5:30
घरी ती पूजा करायची आणि त्या वस्तू आपल्याला स्मशनात फेकून यायला सांगायची असा दावाही त्याने केला होता.

Birthday Special: कंगणा राणौतने या अभिनेत्याचा केला होता मानसिक आणि शारीरिक छळ, अभिनेत्यांनेच सांगितली आपबीती
हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता शेखर सुमन याचा लेक आणि अभिनेता अध्ययन सुमन त्याच्या खाजगी कारणामुळे चर्चेत असतो. कंगणा राणौतमुळे तर त्याची तुफान चर्चा झाली होती. कंगणा राणौतने आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला होता, शिवीगाळ केली होती आणि इतकंच नाही तर सँडल फेकून मारली होती असा आरोप अध्ययनने केला होता. हा सगळा प्रकार 2016 साली हृतिक रोशनने आयोजित केलेल्या बर्थडे पार्टीहून परतताना घडल्याचा आरोप अध्ययने केला होता. त्यावेळी कारमध्ये कंगणाने कारमध्ये असभ्य वर्तन करत मारहाण केल्याचंही अध्ययने म्हटले होते. शिवाय जबरदस्तीने घरी सोडायला सांगितले होते.
मध्यरात्री भररस्त्यात कंगणाने धिंगाणा घालत शिवीगाळ केल्याची आठवणही अध्ययने त्यावेळी सांगितली होती. याशिवाय कंगणा करियरमध्ये यश मिळावं यासाठी काळी जादू करायची असा आरोपही अध्ययनने केला होता. घरी ती पूजा करायची आणि त्या वस्तू आपल्याला स्मशनात फेकून यायला सांगायची असा दावाही त्याने केला होता. अध्ययने कंगणासह 'राज-2' या सिनेमात काम केले होते. या दोघांचं अफेअरही होते मात्र लगेचच दोघांचं ब्रेकअपही झालं.
मध्यंतरी कंगनाला बॉलिवूडमध्ये ब्रेक देण्यावरून ट्वीटरवर एका वादाला तोंड फुटले होते. ‘धोखा’ चित्रपटात काम करण्यास कंगनाने नकार दिल्यामुळे महेश भट संतापले होते. त्यांनी कंगनाला नाही नाही ते सुनावले होते. ‘ वो लम्हे’च्या प्रिव्यूदरम्यान महेश भट यांनी १९ वर्षांच्या कंगनाला चप्पल फेकून मारली होती. त्यांनी कंगनालाच तिचा चित्रपट पाहू दिला नव्हता. यानंतर माझी बहीण रात्रभर रडली होती,’ असे रंगोलीने ट्वीटमध्ये लिहिले होते.