आता येणार पीएम मोदींचे भोजपुरी बायोपिक, हे आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 03:09 PM2019-05-12T15:09:06+5:302019-05-12T15:09:34+5:30

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट  राजकीय वादात अडकून पडला असताना दुसरीकडे मोदींच्या आयुष्यावरच्या भोजपुरी चित्रपटाची तयारी सुरु झालीय.

bjp candidate ravi kishan want to make pm narendra modi biopic in bhojpuri | आता येणार पीएम मोदींचे भोजपुरी बायोपिक, हे आहे कारण!!

आता येणार पीएम मोदींचे भोजपुरी बायोपिक, हे आहे कारण!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘पीएम नरेंद्र मोदी’ गत ११ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकेल.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट  राजकीय वादात अडकून पडला असताना दुसरीकडे मोदींच्या आयुष्यावरच्या भोजपुरी चित्रपटाची तयारी सुरु झालीय.
होय, लोकप्रिय भोजपुरी अभिनेते रवी किशन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर भोजपुरी चित्रपट बनवण्याचा निर्धार केला आहे. केवळ इतकेच नाही तर स्वामी विवेकांनद आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावरचा भोजपुरी चित्रपट बनवण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला आहे.


गोरखपूरमधून भाजपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत असलेले रवी किशन यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आपला हा निर्धार बोलून दाखवला. राजकारणात आल्यानंतर मी चित्रपटांतून गायब होईल, असे मुळीच नाही. मी इथेच गोरखपूरला स्टुडिओ उभारून शूटींग करेल आणि सोबत जनतेची सेवाही करेल. माझ्या डोक्यात अनेक भोजपुरी चित्रपटांच्या कल्पना आहेत. मी मोदींच्या आयुष्यावरही भोजपुरी बायोपिक बनवणार. जेणेकरून भोजपुरी समाज त्यांच्याबद्दल जाणू शकेल. स्वामी विवेकानंद आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरही भोजपुरी चित्रपट बनवण्याचा माझा इरादा आहे, असे त्यांनी सांगितले.


मोदींचे आयुष्य प्रेरणादायी आहे. २०१४ मध्ये ते शौचालयाबद्दल बोलू लागले. एक पंतप्रधान या पद्धतीने विचार करतो, हे पाहून मी कमालीचा प्रभावित झालो. त्यांनी मला प्रचंड प्रभावित केले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी या बायोपिकवर काम सुरु करेल, असेही त्यांनी सांगितले.


अर्थात ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकवर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. ‘पीएम नरेंद्र मोदी’ गत ११ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकेल. यापूर्वी दोनदा ‘पीएम नरेंद्र मोदी’ची रिलीज डेट बदलण्यात आली. आधी हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. यानंतर ५ एप्रिल चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण ऐन रिलीजच्या तोंडावर मेकर्सनी ही तारीख बदलून ११ एप्रिल ही रिलीज डेट निश्चित केली होती.

Web Title: bjp candidate ravi kishan want to make pm narendra modi biopic in bhojpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.