बॉबी डार्लिंग करणार रमणिक शर्माशी विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:17 AM2016-01-16T01:17:54+5:302016-02-07T07:58:24+5:30

एकेकाळी बिग बॉसमध्ये सहभागी होऊन चर्चेचा विषय ठरलेली बॉबी डार्लिंग भोपाळचे उद्योगपती रमणिक शर्मा यांच्याशी विवाह करणार आहे. येत्या ...

Bobby Darling will marry Ramnik Sharma | बॉबी डार्लिंग करणार रमणिक शर्माशी विवाह

बॉबी डार्लिंग करणार रमणिक शर्माशी विवाह

googlenewsNext
ेकाळी बिग बॉसमध्ये सहभागी होऊन चर्चेचा विषय ठरलेली बॉबी डार्लिंग भोपाळचे उद्योगपती रमणिक शर्मा यांच्याशी विवाह करणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये ती 'कोर्ट मॅरेज' करणार असून, त्यानंतर भोपाळ आणि मुंबईत एक रिसेप्शन पार्टीही होणार असल्याचे समजते. बॉबीनेही या वृत्ताला दुजोरा देताना, होय मी रमणिक शर्मा यांच्याशी विवाह करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, याबाबत मला अधिक चर्चा करायला आवडत नसल्याचेही तिने नमूद केले आहे. बॉबीने २0१0 मध्ये लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्याचप्रमाणे २३ वर्षाची असताना तिने १८ 'गे' भूमिका केल्या होत्या. त्यामुळे 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंदही झाली होती. मुनाफ नरुला आणि अंकित शर्मासोबत तिचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची अफवाही होती. मात्र, आता त्या सर्व चर्चेवर पडदा पडला आहे.

Web Title: Bobby Darling will marry Ramnik Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.