भाचीच्या लग्नात बॉबी देओलचा डॉक्यावर ग्लास ठेवून 'जमाल कुडू'वर डान्स; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 18:25 IST2024-02-01T18:25:10+5:302024-02-01T18:25:25+5:30
डोक्यावर ग्लास अन् 'जमाल कुडू'वर डान्स; भाचीच्या लग्नातील बॉबी देओलचा व्हिडिओ व्हायरल

भाचीच्या लग्नात बॉबी देओलचा डॉक्यावर ग्लास ठेवून 'जमाल कुडू'वर डान्स; व्हिडिओ व्हायरल
बॉबी देओलच्या 'जमाल कुडू' गाण्यावरील अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. अनेक सेलिब्रिटींनाही 'जमाल कुडू'वर डान्स करण्याचा मोह आवरता आला नव्हता. अनेकांनी बॉबी देओलसारखा डोक्यावर ग्लास ठेवून डान्स करत 'जमाल कुडू'वर रील व्हिडिओ बनवले होते. अनेक लग्नसमारंभातही हे गाणं वाजताना दिसलं. आता खुद्द बॉबी देओलने या गाण्यावर डान्स केला आहे. भाचीच्या लग्नात बॉबी देओल जमाल कुडूवर थिरकताना दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत बॉबी देओल डोक्यावर ग्लास ठेवून डान्स करताना दिसत आहे. बॉबी देओलची भाची निकिता हिचा उदयपूरमध्ये विवाहसोहळा पार पडला. याला देओल कुटुंबीयांनी हजेरी लावली होती.
दरम्यान, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉबीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण, अनेक सुपरहिट सिनेमांत काम करूनही स्टारडम त्याच्या वाट्याला आलं नाही. आश्रम या वेब सीरिजमधून बॉबीने दमदार कमबॅक केलं होतं. या वेब सीरिजमधील त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही झालं. त्यानंतर 'ॲनिमल'मधून बॉबी देओलने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करत प्रेक्षकांची मनं जिंकली.