बॉबी देओलची पत्नी पाहिलीत का? रोमँटिक फोटो पोस्ट करत म्हणाला…
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 02:21 PM2024-01-24T14:21:23+5:302024-01-24T14:23:40+5:30
बॉबी देओलने तिच्यासोबतचा एक खास रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'अॅनिमल' सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून एकाच कलाकाराचं नाव प्रेक्षकांच्या तोंडावर आहे. तो म्हणजे अभिनेता बॉबी देओल. बॉबीनं या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकरली आणि त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. प्रेक्षकांनी त्यांचं तोंडभरून कौतुकही केलं.ही नेटकरी त्याच्या अभिनयाचं आणि पात्राचं कौतुक करताना थकत नाहीयेत. बॉलिवूडमध्येबॉबी देओल अनेक वर्षांपासून काम करत आहे. पण, त्याची पत्नी खूपच कमी वेळा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी त्याच्यासोबत पाहायला मिळते. नुकतंच बॉबी देओलने तिच्यासोबतचा एक खास रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बॉबी देओलची पत्नी तान्या देओल आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी अभिनेत्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. बॉबी देओलनं तान्या देओलसोबतचा एक अनसीन रोमँटिक फोटो पोस्ट केला आणि तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. चाहत्यांना बॉबीने शेअर केलेला फोटो अतिशय आवडला आहे. बॉबी आणि तान्या नेहमीच मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.
फोटोमध्ये बॉबी देओल पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला दिसत आहे. तर, तान्या वन शोल्डर आउटफिटमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करताना बॉबी देओलने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा'. बॉबी देओलची ही पोस्ट इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांसह अभिनेत्री बिपाशा बसू,अभिनेता शरद केळकर यांनीही तान्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तान्या ही सौंदर्यात अभिनेत्रींनाही मात देते. बॉबी देओल आणि तान्या 30 मे 1996 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना दोन मुले असून बॉबी अनेकवेळा त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्याच्या फॅमिलीचे फोटो पोस्ट करत असतो. बॉबीची पत्नी फिल्मी दुनियेपासून दूर असून ती एक यशस्वी बिजनेस वुमन आहे. तान्या एक इंटिरियर डिझाइनर आहे. बॉबीच्या काही चित्रपटामध्ये कॉस्ट्यूम डिझायनर म्हणूनही देखील तान्याने काम केले आहे.