"तिच्याशिवाय सिनेमा अपूर्ण.." बॉबी देओलनेही केलं 'भाभी 2' तृप्ती डिमरीचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 13:50 IST2023-12-13T13:49:35+5:302023-12-13T13:50:44+5:30
Animal सिनेमातून प्रेक्षकांची नवी नॅशनल क्रश बनलेली अभिनेत्री तृप्ती डिमरीचं कौतुक अजूनही सुरुच आहे.

"तिच्याशिवाय सिनेमा अपूर्ण.." बॉबी देओलनेही केलं 'भाभी 2' तृप्ती डिमरीचं कौतुक
Animal सिनेमातून प्रेक्षकांची नवी नॅशनल क्रश बनलेली अभिनेत्री तृप्ती डिमरीचं (Tripti Dimri) कौतुक अजूनही सुरुच आहे. सध्या जिकडे तिकडे तिचीच चर्चा आहे. Animal सिनेमात तृप्तीने झोया 'भाभी 2' ही व्यक्तिरेखा साकारली. तृप्ती नसती तर सिनेमा अपूर्णच राहिला असता असं म्हणत बॉबी देओलनेही (Bobby Deol) तिचं कौतुक केलं आहे.
नुकतंच फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला,'तृप्ती डिमरीच्या भूमिकेशिवाय हा सिनेमा पूर्णच झाला नसता. ज्याप्रकारे तिने या सिनेमात आपलं टॅलेंट दाखवलं आहे, तिचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.' या शब्दात बॉबीने तृप्तीच्या कामाचं कौतुक केलं आहे.
Animal सिनेमा सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय आहे. यातील बॉबी देओलच्याही कामाचं कौतुक होतंय. त्याचा काही मिनिटांचा प्रेझेन्सही प्रभाव पाडणारा आहे. तर तृप्ती डिमरी या सिनेमामुळे रातोरात स्टार झाली आहे. तिची आणि रणबीरची केमिस्ट्री, इंटिमेट सीन्स पाहून चाहते चकित झालेत. तृप्तीने मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदानालाही साईडलाईन केलं आहे.
1 डिसेंबरला रिलीज झालेला Animal १३ दिवसांनंतरही थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. सिनेमाने 400 कोटींचा गल्ला पार केला आहे. तर 500 कोटींकडे वाटचाल सुरु आहे. रणबीर कपूरचा हा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.