या अभिनेत्रीवर जीवापाड प्रेम करायचा बॉबी देओल, केवळ धर्मेंद्र यांच्यामुळे होऊ शकले नाही लग्न !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 11:20 AM2020-04-09T11:20:58+5:302020-04-09T11:31:03+5:30
1984 मध्ये ‘जवानी’ या सिनेमाद्वारे नीलमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पुढे एकापेक्षा एक हिट चित्रपट आपल्या नावे केलेत.
बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. मात्र अशा खूप कमी कपल आहेत. ज्यांच्या प्रेमाला यश मिळाले आणि सात जन्माच्या आणाभाकात घेत लग्नबंधनात अडकले आहेत. बॉलिवूडमध्ये बॉबी देओलने आज खूर कमी सिनेमात काम केले असले तरी त्याच्या इमेजमुळे त्याने रसिकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. मात्र त्याच्या आयुष्यात अशी एक गोष्ट घडली जी आयुष्यभर त्याच्यात मनात कायम तशीच राहणार आहे. बॉबी आजही त्याच्या अधुरी प्रेमाची कहाणी विसरलेला नसावा.
होय, हीमॅन धर्मेंद्र यांचा मुलगा आणि सनी देओलचा भाऊ म्हणून बॉबी देओल एकेकाळी बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारीच्या प्रेमात आकंत बुडाला होता. नीलम कोठारीचे देकील बॉबीवर जीवापाड प्रेम होते. इतकेच काय तर दोघे लग्नही करणार होते. मात्र पापा धर्मेंद्र यांना बॉबीचे हे लग्न मान्य नव्हते. सिनेमात काम करणारी महिला त्यांना सून म्हणून नको होती. म्हणून त्यांनी हे लग्न होऊच दिले नाही. धर्मेंद्र यांची इच्छा होती कि बॉबीने अरेंज मॅरेज करावे, ज्यानंतर बॉबी देओल आणि नीलम एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले. आणि या दोघांच्या प्रेमालाही पूर्ण विराम लागला.
तसेच बॉबीनंतर गोविंदासह तिचे अफेअर सुरू झाले. पडद्यावरही गोविंदा -नीलमची जोडी प्रचंड गाजली होती. या जोडीने डझनावर सिनेमे केलेत. ‘इल्जाम’ हा दोघांचाही पहिला सिनेमा होता. मात्र हे नातेही फार काळ काही टिकले नाही. गोविंदाच्या आईलादेखील नीलम सून म्हणून नको होती. अखेर 2000 मध्ये नीलमने यूकेचा बिझनेसमन ऋषी सेठियासोबत लग्न केले. पण काहीच वर्षांत दोघांचा घटस्फोट झाला. 2007 मध्ये टीव्ही अभिनेता समीर सोनी नीलमच्या आयुष्यात आला आणि 2011 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांनी एक मुलगी दत्तक घेतली आहे जिचे नाव अहाना आहे. समीर व नीलम दोघांचेही हे दुसरे लग्न आहे.
९० च्या दशकात नीलम कोठारीने तिच्या भूमिकांमुळे रसिकांची तुफान पसंती मिळवली होती. 'दूध का कर्ज', 'हम सात सात है' सिनेमातील नीलमची भूमिका आजही रसिक विसरलेले नाहीत. 1984 मध्ये ‘जवानी’ या सिनेमाद्वारे नीलमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पुढे एकापेक्षा एक हिट चित्रपट आपल्या नावी केलेत.