बॉबी देओल 90 च्या दशकापासून कोरोना विषाणूविरूद्ध देतोय लढा, व्हिडिओच आहे पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 11:08 AM2021-03-30T11:08:04+5:302021-03-30T11:08:43+5:30
90's this scene of Bobby Deol & Aishwarya Rai has been in viewers list. नेटिझन्सनी म्हटलंय की,बॉबी देओल कोरोना विषाणूचा संकट येण्यापूर्वीच तो सर्व आवश्यक खबरदारी घेत होता
जेव्हा जेव्हा एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज रिलीज होते तेव्हा इंटरनेटवर मिमचा पाऊस पडतो. आणि कलाकार मंडळी सोशल मीडियावर बनविल्या जाणाऱ्या व्हायरल होणाऱ्या मिमवर प्रतिक्रिया देऊन आपली नाराजी दर्शवितो, तेव्हा नेटिझन्स त् त्यावर टीका टिप्पणी करत त्यांची टर उडवताना दिसतात. बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचा एक व्हिडिओ इंटरनेटवरून व्हायरल झाला आहे. नेटिझन्स सध्या या विडिओवर विनोद करताना दिसत आहेत.व्हिडिओमध्ये बॉबी देओल ऐश्वर्या रायची कोरोना टेस्ट कर असल्याचे मजेशीर कमेंट्स करत असल्याचं पाहायला मिळतंय.
तर काही नेटिझन्सनी म्हटलंय की,बॉबी देओल कोरोना विषाणूचा संकट येण्यापूर्वीच तो सर्व आवश्यक खबरदारी घेत होता. 90 च्या दशकापासून तो कोरोनो विषाणूविरूद्ध लढत होता.
इतकेच नाही तर व्हिडिओमध्ये बॉबी देओलने सोशल डिस्टन्सिंगचे देखील काटेकोर पालन केले आहे. ऐश्वर्या राय बच्चनची आरटी-पीसीआर चाचणीही तो करतांना दिसत आहेत. व्हायरल होणारा व्हिडिओ और प्यार हो गया चित्रपटातला आहे. गाण्याच्या सीक्वेन्स दरम्यान बॉबीने ऐश्वर्या वर नाक स्वॅब टेस्ट केली होती जिथे तो अभिनेत्रीच्या नाकात काहीतरी घालताना दिसतोय. सध्या कारोना चाचणी देखील अश्याच पद्धतीने केली जात आहे.त्यामुळे व्हिडिओने सोशल मीडियावर साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर. बॉबी देओलने गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये 25 वर्षे पूर्ण केली आहेत. 2018 मध्ये, 'रेस 3' सिनेमाने पुन्हा एकदा त्याला चांगल्या ऑफर येऊ लागल्या. याआधी त्याने सिनेमे केले होते परंतु, त्या सिनेमांना फारसे यश मिळाले नाही. रूपेरी पडदा गाजवल्या नंतर 2020 मध्ये त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पदार्पण केले.
नेटफ्लिक्स वर रिलिज झालेल्या 'क्लास ऑफ 83' आणि त्यानंतर प्रकाश झाच्या 'आश्रम' या वेब सीरिजमध्ये तो झळकला होता. या वेब सीरिजमध्ये साकारलेल्या निराली बाबा भूमिकेसाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कारही मिळाला आहे.सर्वच स्तरांतून त्याचे खूप कौतुक झाले होते.