बॉबी देओलची पत्नी बॉलिवूडच्या अभिनेत्रींपेक्षा आहे खूप सुंदर, राहते लाइमलाइटपासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 13:28 IST2021-05-12T13:27:47+5:302021-05-12T13:28:08+5:30
बॉबी देओलची पत्नी सोशल मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.

बॉबी देओलची पत्नी बॉलिवूडच्या अभिनेत्रींपेक्षा आहे खूप सुंदर, राहते लाइमलाइटपासून दूर
बॉबी देओलची पत्नी तान्या देओल लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. तिचा सिनेइंडस्ट्रीशी फारसा संबंध नाही. ती दिवंगत देवेंद्र आहूजा यांची मुलगी आहे, जे सेंचुरियन बँकचे प्रमोटर आणि एका मोठ्या कंपनीचे एमडी होते. तिला एक भाऊ आहे ज्याचे नाव विक्रम आहूजा तर एक बहिण आहे, जिचे नाव आहे मुनीशा. जाणून घेऊयात तान्या आणि बॉबी देओलच्या लव्हस्टोरीबद्दल...
बॉबी देओल बरसात चित्रपटाच्या रिलीजनंतर यशाच्या शिखरावर होता. त्याचा हा पहिला बॉलिवूड चित्रपट होता आणि त्याचे या चित्रपटातील कामाचे खूप कौतुक झाले होते. बॉबी आपल्या मित्रांसोबत मुंबईतील कोणत्या तरी एका हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. याच ठिकाणी तान्या आणि बॉबीने एकमेकांना पहिल्यांदा पाहिले होते.
तान्याला पहिल्यांदा पाहताच बॉबी तिच्यावर फिदा झाला होता. तिच्या सौंदर्याची भुरळ बॉबीवर इतकी पडली की त्याने त्याच्या मित्रांना तान्याबद्दल माहिती गोळा करायला सांगितली.
तेव्हा त्याला कळलं की तिचे नाव तान्या आहुजा आहे आणि तिने एका फायनान्स कंपनीतील मॅनेजरची मुलगी आहे.
खूप प्रयत्नानंतर बॉबीला तिचा फोन नंबर मिळाला आणि त्याने तिला डेटसाठी बोलवले. बॉबी देओलने केलेल्या सर्व प्रयत्नांमुळे तान्या त्याच्यासोबत डेटवर जायला तयार झाली आणि त्यांची लव्हस्टोरी बहरू लागली.
पहिल्या डिनर डेटनंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले. बॉबी सोशल मीडियावर पत्नी आणि मुलांसोबतचे फोटो शेअर करत असतो.
बॉबीने १९९६ साली तान्या देओलसोबत लग्न केले होते. तान्या देओल सोशल मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर राहते.