Body-Shaming tweet : क्रिती सॅननने भैरवी गोस्वामीला दिले जशास तसे उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 08:51 AM2017-08-03T08:51:26+5:302017-08-03T14:23:18+5:30

‘मुबारकां’ या अर्जुन कपूर व अनिल कपूरचा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटासोबतच याच्याशी संबंधित एक अध्यायही गाजला.  होय,अभिनेत्री ...

Body-Shaming tweet: Kryti Sanan gave Bhairavi Goswami a reply! | Body-Shaming tweet : क्रिती सॅननने भैरवी गोस्वामीला दिले जशास तसे उत्तर!

Body-Shaming tweet : क्रिती सॅननने भैरवी गोस्वामीला दिले जशास तसे उत्तर!

googlenewsNext
ुबारकां’ या अर्जुन कपूर व अनिल कपूरचा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटासोबतच याच्याशी संबंधित एक अध्यायही गाजला.  होय,अभिनेत्री क्रिती सॅनन ‘मुबारकां’मधील ‘हवा हवा’ गाणे प्रमोट केले होते. या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ क्रितीने अपलोड केला होता. यानंतर काय झाले होते? हे तर आम्ही तुम्हाला सांगितले आहेच. विसरला असाल तर आम्ही पुन्हा एकदा सांगतो.
क्रितीचा हा व्हिडिओ काही जणांना भलताच खटकला होता. क्रितीचा हा व्हिडिओ खटकणा-यांमध्ये कमाल आर खान अर्थात केआरके आघाडीवर होता. ‘ही बघा, बिच्चारी क्रिती. ‘राबता’ फ्लॉप झाल्यानंतर बिचारी मेंटली डिस्टर्ब झाली आहे,’असे tweet त्याने हा व्हिडिओ पाहून केले होते.



क्रितीला डिवचणा-या केआरकेच्या या tweetवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या होत्या. या कमेंट्समध्ये होस्ट अ‍ॅण्ड अ‍ॅक्ट्रेस भैरवी गोस्वामी हिचीही एक कमेंट होती. ‘ही वेड्यासारखी वागतेय. ही अभिनेत्री बनलीच कशी. ना हेडलाईट आहेत, ना बंपर. कॉलेज स्टुडंट तरी हिच्यापेक्षा चांगले दिसतात,’ असे भैरवीने म्हटले होते. भैरवीच्या या कमेंटने क्रितीचा किती तीळ-पापड झाला असेल हे सांगणे नकोच. पण भैरवीच्या कमेंटवर प्रतिक्रिया देणे आत्तापर्यंत क्रितीने टाळले होते. पण शेवटी तिला राहावले नाहीच. मग काय, एका इव्हेंटमध्ये अखेर या कमेंटवरून तिने भैरवीला सुनावलेच. भैरवीच्या कमेंटबद्दल क्रितीला या इव्हेंटमध्ये विचारण्यात आले.

ALSO READ : क्रिती सॅननला ‘पागल’ म्हणणारी भैरवी गोस्वामी आहे तरी कोण?

यावर क्रितीने काय उत्तर दिले माहितीयं.  ‘भैरवी गोस्वामी? कौन भैरवी गोस्वामी? असे प्रारंभी क्रितीने विचारले आणि मग भैरवीचे शब्द तिच्याच घशात घातले. भैरवीसाठी मी आनंदी आहे. कारण यामुळे तिला फुकटची पब्लिसिटी मिळाली. आता तुम्हा सगळ्यांना किमान तिचे नाव माहित झाले, असे क्रिती म्हणाली. आता क्रितीचे हे उत्तर भैरवीला किती झोंबते, ते बघूच.

Web Title: Body-Shaming tweet: Kryti Sanan gave Bhairavi Goswami a reply!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.