'बॉडीगार्ड' चे दिग्दर्शक सिद्दीकी इस्माईल यांचं निधन, ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 09:03 AM2023-08-09T09:03:24+5:302023-08-09T09:05:12+5:30
इस्माइल सिद्दीकी मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील मोठं नाव.
अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) ब्लॉकबस्टर चित्रपट 'बॉडीगार्ड' (Bodyguard) चे दिग्दर्शक सिद्दीकी इस्माइल (Siddique Ismail) यांचं निधन झालं आहे. ते ६३ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील ते लोकप्रिय दिग्दर्शक होते. काही दिवसांपासून ते न्युमोनिया आणि लिव्हरच्या आजाराने त्रस्त होते. उपचारासाठी त्यांनी कोच्ची येथील अमृता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
सिद्दीकी इस्माइल मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील मोठं नाव. त्यांनी दिग्दर्शनासोबतच अभिनयही केला आहे. न्युमोनिया आणि लीव्हरच्या आजारामुळे त्यांना एक्स्ट्राकोर्पोरियल मेम्ब्रेन च्या सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. ते लवकरच घरी येतील अशीच सर्वांना आशा होती मात्र अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मल्याळम तसंच बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
1989 साली 'रामजी राव स्पीकिंग' या मल्याळम सिनेमातून इस्माइल सिद्दीकी करिअरला सुरुवात केली. 'हरिहर नगर', 'गॉडफादर', 'काबुलीवाला', 'हिटलर' आणि 'व्हियतनाम कॉलनी' अशा अनेक सिनेमांसाठी त्यांना ओळखलं जातं. 'बिग ब्रदर' हा त्यांचा शेवटचा चित्रपट जो सुपरहिट ठरला.