‘या’ बोल्ड अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील ‘ही’ दोन गावे घेतली दत्तक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 04:33 PM2018-04-05T16:33:17+5:302018-04-05T22:03:17+5:30

सोशल मीडियावर नेहमीच आपले बोल्ड फोटो शेअर करून खळबळ उडवून देणारी अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे नव्हे ...

This 'bold' actress adopted two villages 'Uttar Pradesh'! | ‘या’ बोल्ड अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील ‘ही’ दोन गावे घेतली दत्तक!

‘या’ बोल्ड अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील ‘ही’ दोन गावे घेतली दत्तक!

googlenewsNext
शल मीडियावर नेहमीच आपले बोल्ड फोटो शेअर करून खळबळ उडवून देणारी अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे नव्हे तर सामाजिक कार्यामुळे चर्चेत आली आहे. होय, ईशाने उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातील दोन गावे दत्तक घेतली आहेत. ईशा या गावांच्या विकासासाठी सर्वोपरी प्रयत्न करणार आहे. काही दिवसांपूर्वीच ईशाने एका अशा अकॅडमीची घोषणा केली होती, ज्या माध्यमातून ती भारतातील गुणवंत मात्र आर्थिक परिस्थितीने हतबल असलेल्या खेळाडूंना मदत करेल. आता ईशाने या दोन गावांची जबाबदारी स्वीकारून समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. 

बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार ईशान गुप्ताने म्हटले की, सर्वांनाच शिक्षणाचा हक्क आहे. बरेचशी मुले आहेत, ज्यांना शिक्षण घेऊन आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्याची इच्छा आहे. मात्र पुरेशा सुविधा नसल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. जर अशा मुलांची मदत केली तर मी स्वत:ला भाग्यवान समजेल. ईशा दिल्लीतील एका एनजीओबरोबर काम करीत आहे. या एनजीओच्या माध्यमातून ती ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी शक्य ते प्रयत्न करीत आहे. ईशाने सांगितले की, ‘मी दत्तक घेतलेल्या दोन्ही गावांत दोनच शाळा असून, त्या शाळांत सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असेल. 

ईशाने सांगितले की, या शाळा रहिवासी परिसरापासून खूप दूर आहेत. त्याठिकाणी सुविधांचाही अभाव आहे. त्यामुळे त्यामध्ये सुधारणा करण्याची खूप गरज आहे. सूत्रानुसार, ईशा शिक्षकांची भरती करण्यासाठी फंडिंग करणार आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या एका रिपोर्टमध्ये लिहिण्यात आले की, एनजीओ त्या शिक्षकांची यादी तयार करणार जे शाळेपर्यंत सहज पोहचू शकतील. रिपोर्ट्समध्ये याचादेखील उल्लेख करण्यात आला की, ईशा केवळ शाळेसाठी प्रोजेक्टर्स खरेदी करणार नाही तर चांगले शौचालय आणि ग्रंथालय उभारण्यास मदत करेल. 

Web Title: This 'bold' actress adopted two villages 'Uttar Pradesh'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.