एक दशकानंतर पडद्यावर परतणार ‘ही’ बोल्ड अभिनेत्री; सेक्स वर्करची साकारणार भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 09:09 AM2018-02-18T09:09:37+5:302018-02-18T15:04:14+5:30

तब्बल दहा वर्षांपासून ही अभिनेत्री पडद्यावर परतणार आहे. तिच्या कमबॅक चित्रपटात ती सेक्स वर्करची भूमिका साकारताना बघावयास मिळेल.

'A' bold actress to return to the screen after a decade; Role of the sex workers! | एक दशकानंतर पडद्यावर परतणार ‘ही’ बोल्ड अभिनेत्री; सेक्स वर्करची साकारणार भूमिका!

एक दशकानंतर पडद्यावर परतणार ‘ही’ बोल्ड अभिनेत्री; सेक्स वर्करची साकारणार भूमिका!

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री मेघना नायडू जवळपास दहा वर्षांनंतर पडद्यावर परतणार आहे. मेघना तिच्या आगामी चित्रपटात सेक्स वर्करची भूमिका साकारताना बघावयास मिळेल. मेघनाने सांगितले की, ती ‘सितारा’ या बांग्ला चित्रपटातून कमबॅक करणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना मेघनाने म्हटले की, माझ्या भूमिकेचे नाव लोखोन्ना असेल. जी भारत आणि बांग्लादेशमध्ये होणाºया साहित्याची तस्करी करण्यास मदत करीत असते. शिवाय ती एका वेश्यावृत्तीशी संबंध ठेवणाºया गटाशी जोडलेली असते. 

चित्रपटाची कथा त्याकाळातील आहे, जेव्हा भारत आणि बांग्लादेशमध्ये काही साहित्याची तस्करी केली जात असे. मेघनाविषयी सांगायचे झाल्यास तिने बॉलिवूडमधील बºयाचशा बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांमधून तिने स्वत:ला प्रचंड एक्सपोजही केले. मात्र अशातही बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यास ती अपयशी ठरली. पुढे तिने साउथ इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. तिने दोन कन्नड चित्रपटांमध्ये कामही केले. तिने बॉलिवूडमध्ये ‘हवस’ या चित्रपटामधून डेब्यू केला होता.
 

मेघनाने म्हटले की, ‘बांग्ला खूपच प्रेमळ भाषा आहे. मात्र ती बोलणे जरा अवघडच आहे. हा चित्रपट माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. चित्रपटात मी रमिया सेन, एम. नस्सार आणि जाहिद हसन यांच्यासोबत काम करणार आहे. मी एक डान्सर आणि परफॉर्मर म्हणून काम करणे खूप एन्जॉय केले आहे. मी या वर्षाची सुरुवात परिवार आणि मित्रांसोबत केली. गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच मी नव्या वर्षानिमित्त एखादा शो केला नाही. 

Web Title: 'A' bold actress to return to the screen after a decade; Role of the sex workers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.