बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल कंगना राणौत चित्रपट सोडून राजकारणात घेणार एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 04:48 AM2018-02-21T04:48:07+5:302018-02-21T10:18:07+5:30

बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री कंगना राणौत कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत चर्चेत असतेच. खरे तर, हृतिक रोशनसोबतचा तिचा ...

Bold And Beautiful Kangana Ranout movie leaving politics to enter politics? | बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल कंगना राणौत चित्रपट सोडून राजकारणात घेणार एन्ट्री?

बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल कंगना राणौत चित्रपट सोडून राजकारणात घेणार एन्ट्री?

googlenewsNext
लिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री कंगना राणौत कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत चर्चेत असतेच. खरे तर, हृतिक रोशनसोबतचा तिचा वाद चव्हाट्यावर आला त्याला आता उणेपुरे वर्ष झालेयं. (अर्थात अद्यापही कंगना हा वाद अधूनमधून चघळत असतेच.) ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या कंगनाच्या आगामी चित्रपटावर जमू लागलेले विरोधाचे ढगही दूर झालेत. पण तरिही कंगना चर्चेत आहे. होय, कंगनाला म्हणे, राजकारण खुणावू लागलेयं. ताज्या बातमीनुसार, कंगना राजकारणात एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकारणात करिअर बनवण्यावर कंगनाने गंभीरपणे विचार चालवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कंगना अनेकदा भेटली आहे. चर्चा खरी मानाल तर हिमाचल प्रदेशाच्या राजकारणात कंगना एन्ट्री घेऊ शकते. मूळची हिमाचलची असल्याने येथील राजकारणात पाय पसरणे कंगनासाठी तुलनेने सोपे असणार आहे.

  कंगनाच्या टीमशी यासंदर्भात संपर्क साधला असता, त्यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावले. या सगळ्या अफवा आहेत. कंगना सध्या चित्रपटात बिझी आहे आणि तिचे संपूर्ण लक्ष ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’वर आहे, असे तिच्या पीआर मॅनेजरने स्पष्ट केले.
तुम्हाला ठाऊक असेलच की, दोन वर्षांपूर्वी स्वच्छता मोहिमेसंदर्भातील एका व्हिडिओ कंगनाने काम केले होते. या व्हिडिओत देवी लक्ष्मी बनून कंगना स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करताना दिसली होती. याच व्हिडिओसंदर्भात ती पहिल्यांदा पंतप्रधान मोदी यांना भेटली होती.

ALSO READ : कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका : द क्विन आॅफ झांसी’साठी करावी लागणार ‘आॅगस्ट’ची प्रतीक्षा!

लवकरच कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका : द क्विन आॅफ झांसी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अर्थात अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट आलेली नाही. आधी हा चित्रपट यावर्षी एप्रिलमध्ये येणार, अशी खबर होती. पण मध्यंतरी या ऐतिहासिक चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची खबर आली. इंग्रज आणि झांसीची राणी यांच्यातील लढाईवर आधारित असलेला हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर  आल्यास लोकांच्या भावना ‘कॅश’ करता येतील, या कारणाने हा चित्रपट लांबणीवर टाकण्यात आल्याचे कळते.

 

Web Title: Bold And Beautiful Kangana Ranout movie leaving politics to enter politics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.